निघोजेत २५० महिलांना कौशल्य प्रशिक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निघोजेत २५० महिलांना कौशल्य प्रशिक्षण
निघोजेत २५० महिलांना कौशल्य प्रशिक्षण

निघोजेत २५० महिलांना कौशल्य प्रशिक्षण

sakal_logo
By

कुरुळी, ता.१२ : ग्रामीण भागातील महिलांच्या कला, कौशल्य हे महिलांचे एक करमणुकीचे साधन नसून स्वतःच्या पायावर उभे राहण्याचे साधन आहे, असे प्रतिपादन आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी व्यक्त केले.
निघोजे (ता. खेड) येथे ग्रामपंचायतीच्या निधीतून ग्रामीण इन्स्टिट्यूट फॉर एज्युकेशनल एक्सलन्स पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कौशल्य विकास प्रशिक्षण गावातील २५० महिलांनी सहभाग घेतला. त्यांना आमदार मोहिते पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र देण्यात आली.
पंधराव्या वित्तआयोग अंतर्गत महिला व मुलींना व्यवसाय प्रशिक्षण हॅन्ड एम्ब्रॉयडरी (आरी वर्क) आणि साडीचे गोंडे याचे प्रशिक्षण देण्यात आले. याप्रसंगी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सुरेखा मोहिते, खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्षा संध्या जाधव, सरपंच रमेश गायकवाड, उपसरपंच रूपाली येळवंडे, सरपंच परिषदेचे अध्यक्ष आशिष येळवंडे, माजी उपसरपंच रामदास येळवंडे, जितेंद्र आल्हाट, नीलेश पवार, संदीप येळवंडे चंद्रकांत बेंडाले, सुनीता शिंदे, अलका पाडेकर, वृषाली पानसरे, नम्रता येळवंडे, सुजाता फडके, रिठाबाई सोनवणे, ग्रामविकास अधिकारी व्ही. गाडीलकर, आजी माजी पदाधिकारी, महिला वर्ग उपस्थित होते .

01300

Web Title: Todays Latest District Marathi News Krr22b00647 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..