चाकण येथील कोंडीची समस्या सुटेना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चाकण येथील कोंडीची समस्या सुटेना
चाकण येथील कोंडीची समस्या सुटेना

चाकण येथील कोंडीची समस्या सुटेना

sakal_logo
By

कुरुळी, ता. १३ ः पुणे-नाशिक महामार्गावर चिंबळी फाटा, कुरुळी फाटा, स्पायसेल चौक, आळंदी फाटा, तळेगाव चौक, आंबेठाण चौक या ठिकाणी दररोज वाहतूक कोंडी होत आहे.
चाकण औद्योगिक भागात आणि पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर ठीक-ठिकाणी अनधिकृत पार्किंग, फेरीवाले, अवैध प्रवासी वाहतुकीची वाहने आणि अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी होते. धक्कादायक म्हणजे चाकण आणि महाळुंगे वाहतूक विभाग महसुली कारवायांमध्ये व्यस्त असल्याने वाहतूक कोंडीची समस्या चाकण आणि औद्योगिक भागात तीव्र होऊ लागली आहे.
पुणे-नाशिक हा राष्ट्रीय महामार्ग नाशिक व पुणे या महत्त्वाच्या शहरांना जोडतो तर मुंबई, नगर आणि औरंगाबाद अशा महत्त्वाच्या शहरांना जोडणाऱ्या वडगाव मावळ ते शिक्रापूर दरम्यानचा महामार्ग आहे. वडगाव, तळेगाव, एमआयडीसी, चाकण, शिक्रापूर भागातील औद्योगिक भागाच्या हद्दीतून जाणारा हा मार्ग असून यावरील वाहतूक कित्येक पटीने वाढली आहे. चाकण औद्योगिक भागातील वाहतूक कोंडी तातडीने सोडवावी अशी प्रवासी, वाहन चालक आणि नागरिकांची मागणी आहे. अवजड ट्रक, ट्रेलर, कंटेनर या वाहन चालकांमधील शिस्तीचा अभाव आणि वाहतुकीचे नियम डावलून होत असलेली अवजड वाहतूक हे कोंडी मागचे प्रमुख कारण आहे. चाकण वाहतूक शाखेचे अधिकारी- कर्मचारी सध्या वाहतूक नियमन सोडून अन्यच कामात स्वारस्य दाखवत असल्याने ही स्थिती ओढावल्याचा प्रवाशांचा आरोप आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Krr22b00650 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..