Fri, Sept 22, 2023

गुटख्याच्या विक्रीप्रकरणी
कुरुळी येथे एकाला अटक
गुटख्याच्या विक्रीप्रकरणी कुरुळी येथे एकाला अटक
Published on : 17 May 2023, 1:39 am
कुरुळी, ता. १७ : कुरुळी (ता. खेड) गुटखा विक्रीप्रकरणी अमली पदार्थ विरोधी पथकाने एकाला सोमवारी (ता. १५) अटक केली. दौलत ऊर्फ पप्पू मुलाराम बोस (३१, रा. नाणेकरवाडी, चाकण) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी दोन लाख २० हजार २९ रुपये किमतीचा गुटखा, सुगंधित तंबाखू आणि पानमसाला जप्त केला आहे. याबाबत म्हाळुंगे एमआयडीसी पोलिस तपास करीत आहेत.