कौठडीत डाळिंब उत्पादकांना प्रशिक्षण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कौठडीत डाळिंब उत्पादकांना प्रशिक्षण
कौठडीत डाळिंब उत्पादकांना प्रशिक्षण

कौठडीत डाळिंब उत्पादकांना प्रशिक्षण

sakal_logo
By

कुरकुंभ, ता. २० : दौंड तालुक्यामध्ये डाळिंब पिकावर शॉट होल बोरर व मर या रोगांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. शेतकऱ्यांनी प्रादुर्भाव झालेल्या झाडांचा भाग काढून जाळून टाकणे, तज्ज्ञांच्या सल्लानुसार औषध फवारणी करणे, झाडाला लेप देणे इत्यादी उपाययोजन करून बागेचे काळजी घ्यावी, असे आवाहन राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्राचे शास्रज्ञ डॉ. मल्लिकार्जुन यांनी केले.
कौठडी (ता. दौंड) येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) योजनेअंतर्गत आणि द फार्मची सोशल विंग फार्मएज्युकॉन रिसर्च फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांसाठी पिन होल बोरर व मर रोग व्यवस्थापन प्रशिक्षणाचे आयोजन केले होते. याप्रसंगी ''आत्मा''चे पुणे जिल्हा प्रकल्प संचालक राजेंद्र साबळे, उपसंचालक पूनम खटावकर, तालुका कृषी अधिकारी राहुल माने, आत्माचे तंत्रज्ञान व्यवस्थापक महेश रूपनवर उपस्थित होते.
शेतकरी सल्ला समितीचे अध्यक्ष अरुण भागवत, सदस्य गोरख रसाळ, अमर देवकर मनोगत व्यक्त केले, याप्रसंगी सरपंच प्रीती मेरगळ, महेंद्र जगताप, संजय कदम, पोपट चीपाडे, संदीप सरक, अझर सय्यद, प्रकाश लोणकर, अतुल होले, अंगद शिंदे, मोनिका दिवेकर, शंकर कांबळे व डाळिंब उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
प्रकाश लोणकर यांनी सूत्रसंचालन केले. कृषी सहाय्यक अझर सय्यद यांनी आभार मानले.

00813

Web Title: Todays Latest District Marathi News Kur22b00422 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top