पक्षावर निष्ठा ठेवणाऱ्यांना भाजपमध्ये न्याय : राम शिंदे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पक्षावर निष्ठा ठेवणाऱ्यांना
भाजपमध्ये न्याय : राम शिंदे
पक्षावर निष्ठा ठेवणाऱ्यांना भाजपमध्ये न्याय : राम शिंदे

पक्षावर निष्ठा ठेवणाऱ्यांना भाजपमध्ये न्याय : राम शिंदे

sakal_logo
By

कुरकुंभ, ता. २५ : ‘‘भाजपमध्ये पक्षावर निष्ठा ठेवणाऱ्या व प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला न्याय दिला जातो. त्यामुळे मला पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी विधान परिषदेत काम करण्याची संधी दिली,’’ अशी माहिती नवनिर्वाचित विधान परिषद सदस्य व भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. राम शिंदे यांनी व्यक्त केले.
विधान परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत विजयी झालेले प्रा. राम शिंदे यांचा कुरकुंभ (ता. दौंड) येथे भाजप किसान मोर्चा व कुरकुंभ ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दिलीप खैरे, मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष गणेश जगताप, वैभव आटोळे, कुरकुंभचे सरपंच आयुब शेख, सनी सोनार, सुनील पवार आदी उपस्थित होते. याप्रसंगी कुरकुंभ ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत भागवत व बापूराव झगडे, राहुल शितोळे, विकास काळे, नानासाहेब झगडे, चंद्रकांत जाधव आदी उपस्थित होते.
PNE22S73587

Web Title: Todays Latest District Marathi News Kur22b00427 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..