जिरेगावात सुरक्षित अन्न मिनी किटचे वाटप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिरेगावात सुरक्षित अन्न मिनी किटचे वाटप
जिरेगावात सुरक्षित अन्न मिनी किटचे वाटप

जिरेगावात सुरक्षित अन्न मिनी किटचे वाटप

sakal_logo
By

कुरकुंभ, ता. २८ : जिरेगाव (ता.दौंड) येथे कृषी संजिवनी मोहिमेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योग, तृणधान्याचे महत्त्व, फळबाग लागवड इत्यादी विषयी मार्गदर्शन व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी पोषणयुक्त सुरक्षित अन्न मिनी किटचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी कृषी सहाय्यक अंगद शिंदे यांनी कृषी संजीवनी सप्ताहाबाबत माहिती दिली. तर मंडळ कृषी अधिकारी महेंद्र जगताप यांनी पौष्टिक तृणधान्य दिवस, तृणधान्याचे महत्त्व, प्रक्रिया उद्योगातील संधी याबाबत मार्गदर्शन केले. कृषी विभागाच्या विविध योजना, एमआरइजीएस योजनेंतर्गत फळबाग लागवड, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजना, महाडीबीटी या योजनांबाबत कृषी सहायक अतुल होले यांनी माहिती दिली. एकरी शंभर टन ऊस उत्पादनाबाबत मार्गदर्शन अझरुद्दीन शेख यांनी केले. पर्यवेक्षक संजय कदम यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन शंकांचे निरसन केले. याप्रसंगी नागनाथ शिंदे, सुमीत पवार, हनुमंत खंडाळे आदी उपस्थित होते. कृषी सेवक संदीप सरक यांनी उपस्थितांचे आभार मानले.
00828

Web Title: Todays Latest District Marathi News Kur22b00429 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top