कुरकुंभमधील हार्मोनी कंपनीतून ४७ लाखांच्या केमिकलची चोरी कुरकुंभमधील हार्मोनी कंपनीतून ४७ लाखांच्या केमिकलची चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुरकुंभमधील हार्मोनी कंपनीतून ४७ लाखांच्या केमिकलची चोरी
कुरकुंभमधील हार्मोनी कंपनीतून ४७ लाखांच्या केमिकलची चोरी
कुरकुंभमधील हार्मोनी कंपनीतून ४७ लाखांच्या केमिकलची चोरी कुरकुंभमधील हार्मोनी कंपनीतून ४७ लाखांच्या केमिकलची चोरी

कुरकुंभमधील हार्मोनी कंपनीतून ४७ लाखांच्या केमिकलची चोरी कुरकुंभमधील हार्मोनी कंपनीतून ४७ लाखांच्या केमिकलची चोरी

sakal_logo
By

कुरकुंभ, ता. २ : कुरकुंभ (ता. दौंड) औद्योगिक वसाहतीतील हार्मोनी ऑरगॅनिक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतून ४७ लाख २७ हजार २५० रुपये किंमतीचे केमिकल चोरी गेले आहे. केमिकल चोरीत मोठी टोळी कार्यरत असून पाच कंपन्यांमधील आतापर्यंत ७ कोटी ३० लाख ५१ हजार २५० रुपयांची केमिकल चोरी झाली आहे. या चोऱ्यांचा कसून तपास करून केमिकल चोरी करणाऱ्या टोळीचे कायमस्वरूपी कंबरडे मोडण्याची आवश्यकता आहे.
कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील हार्मोनी ऑरगॅनिक्स कंपनीतील पॅलेडियम कॅटॅलिस्ट २६ किलो तर कॅटॅलिस्ट १०१ नावाचे १७ किलो वेगवेगळया डब्यात ठेवलेले सीलबंद केमिकल २६ जूनला रात्री ते २७ जून २०२२ च्या सकाळ दरम्यान अज्ञात चोरट्यानेचोरून नेल्याचे निदर्शनास आहे. यासंदर्भात कंपनीचे स्टोअर्स मॅनेजर दीपक मोतिराम चौधरी ( वय ५६, रा. बारामती - भिगवण रोड इनामदारनगर पांडुरंग प्रेस्टीज फ्लॅट नं. ३६, बारामती ) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वी औद्योगिक वसाहतीतील इटर्निस कंपनीतून ५ कोटी ४७ लाख २० हजार रूपयांचे केमिकल व मोडिप्रो कंपनीतून ७५ लाखाचे केमिकल, मेल्झर कंपनीतून ४८ लाख ५० हजाराचे तर एमक्युअर कंपनीतून १२ लाख ५४ हजारांचे केमिकल चोरीला गेले आहे. वसाहतीतून आतापर्यंत चोरीला गेलेल्या केमिकलची किंमत ७ कोटी ३० लाख ५१ हजार २५० रुपये आहे. यासंदर्भात पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले असून यातील काही आरोपींना अटकही करण्यात आली आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Kur22b00433 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top