कुरकुंभ येथील महिलेचे अपहरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कुरकुंभ येथील महिलेचे अपहरण
कुरकुंभ येथील महिलेचे अपहरण

कुरकुंभ येथील महिलेचे अपहरण

sakal_logo
By

कुरकुंभ, ता. ६ : दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील अल्कली अमाईन्स कंपनीमध्ये कामाला जाणाऱ्या पंचेचाळीस वर्षीय एका महिलेचे शुक्रवारी (ता. ५) सकाळी अज्ञात महिलांनी अपहरण केले.
याबाबत कुरकुंभ येथे कामानिमित्त आलेले व मूळचे देऊळगाव गार (ता. सेलू, जि. परभणी) येथील सुनील बाबासाहेब कणसे (वय २५, सध्या रा. बारवकरवस्ती-कुरकुंभ, ता. दौंड) याने पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुनील याची आई ऊर्मिला बाबासाहेब कणसे या ५ ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील अल्कली अमाईन्स कंपनीत कामाला जात होत्या. त्यावेळी अज्ञात महिलांनी अपहरण करून त्यांना अज्ञात वाहनातून घेऊन गेले. या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात महिलांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात अधिक माहिती मिळाल्यास दौंड पोलिसांशी ०२११७/२६२३३३ या क्रमांकावर संपर्क साधावा. याबाबतचा तपास पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार मिसाळ व वाघमारे करीत आहेत.

Web Title: Todays Latest District Marathi News Kur22b00450 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..