गांडूळ खत पोतसुधारण्यास उपयुक्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गांडूळ खत पोतसुधारण्यास उपयुक्त
गांडूळ खत पोतसुधारण्यास उपयुक्त

गांडूळ खत पोतसुधारण्यास उपयुक्त

sakal_logo
By

कुरकुंभ, ता. १ : मळद (ता. दौंड) येथे कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) दौंड, कृषी विज्ञान केंद्र बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने गांडूळ खत उत्पादनाचे कौशल्य आधारित दोन दिवसाचे प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी तज्ज्ञांनी
गांडूळ खत जमिनीचा पोत सुधारण्यास कसे उपयुक्त आहे याबाबत मार्गदर्शन केले व गांडूळखत निर्मितीचे प्रात्यक्षिक दाखविले.
कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा प्रकल्प संचालक (आत्मा) पूनम खटावकर, उपविभागीय कृषी अधिकारी वैभव तांबे, तालुका कृषी अधिकारी राहुल माने यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती कृषी विज्ञान केंद्राचे कृषितज्ज्ञ प्रशांत गावडे यांनी गांडूळ खताचे महत्त्व, त्याच्या प्रजाती, बेड तयार करण्याची पद्धतीचे प्रात्यक्षिकासह शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. जे.के. ऑरगॅनिक्सचे सुदिप वणवे, तालुका कृषी अधिकारी राहुल माने, आत्माचे तंत्रज्ञान व्यवस्थापक महेश रूपनवर यांनी मार्गदर्शन करून गांडूळखताच्या वापराचे आवाहन केले.

कार्यशाळेत तालुका कृषी अधिकारी राहुल माने यांनी उपस्थित शेतकऱ्यांना प्रधानमंत्री सुक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेत सहभागी होण्याचे आवाहन केले. आत्माचे महेश रूपनवर यांनी गांडूळखताचे महत्त्व पटवून दिले. कृषी सहायक अजहरुद्दीन सय्यद यांनी प्रधानमंत्री किसान योजनेचा पुढील लाभ मिळण्यासाठी केवायसी करून घेण्याचे आवाहन केले. यावेळी कृषी पर्यवेक्षक पाटस संजय कदम, कृषी सहायक अंगद शिंदे, अतुल होले, कृषिमित्र संदीप गायकवाड, गोरख रसाळ, नितीन शेळके, रवींद्र शेलार, पोपट लांडगे, जनार्दन भागवत, भाऊसाहेब धुमाळ, पोपट मगर, विकास खोसे, हृतिक निमगिरे, विजय नरुटे आदी शेतकरी उपस्थित होते.

00878

Web Title: Todays Latest District Marathi News Kur22b00457 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..