सव्वा दोन लांखाच्या बॅटरी कुरकुंभमधून लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सव्वा दोन लांखाच्या बॅटरी कुरकुंभमधून लंपास
सव्वा दोन लांखाच्या बॅटरी कुरकुंभमधून लंपास

सव्वा दोन लांखाच्या बॅटरी कुरकुंभमधून लंपास

sakal_logo
By

सव्वा दोन लांखाच्या बॅटरी कुरकुंभमधून लंपास
कुरकुंभ, ता. १८ : दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील पोलिस मदत केंद्रापासून हाकेच्या अंतरावरील सिद्धी बॅटरीज या दुकानाच्या छतावरील पत्रा फोडून अज्ञात चोरट्यांनी २ लाख २५ हजार रुपये किमतीच्या बॅटरी चोरून नेल्या. ही घटना शनिवारी (ता. १७) रात्री बारा ते पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.

कुरकुंभ येथील मनमाड - बंगलोर राष्ट्रीय महामार्गालगतच्या हॉटेल आनंद गार्डन परिसरात असलेल्या सिद्धी बॅटरीजमधील चोरीप्रकरणी दुकानमालक मंगेश चव्हाण यांनी पोलिसात तक्रार दिली आहे. दोन दिवसांपूर्वी महामार्गालगत असलेल्या राहुल ज्वेलर्स या सोने-चांदीच्या दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडून दरोडा टाकण्याचा प्रयत्न ग्रामस्थ व पोलिसांच्या सतर्कतेमुळे फसला. वाहनचालक व कामगारांना लुटणे, भंगार, पेट्रोल, डिझेल, खाद्यतेल, केबल चोरी, कंपन्यांमधील वस्तूंच्या चोरीच्या घटना वारंवार घडत असल्याने कुरकुंभमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
-------------------------------------------
कुरकुंभ ः अज्ञात चोरट्यांनी फोडलेला सिद्धी बॅटरीजच्या छताचा पत्रा.

Web Title: Todays Latest District Marathi News Kur22b00463 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..