खडकी येथे १९ लाखांचा गुटखा जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खडकी येथे १९ लाखांचा गुटखा जप्त
खडकी येथे १९ लाखांचा गुटखा जप्त

खडकी येथे १९ लाखांचा गुटखा जप्त

sakal_logo
By

कुरकुंभ, ता. २२ : दौंड तालुक्यातील पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गस्त घालणाऱ्या पोलिस पथकाला एका महेंद्र बोलेरो पिकअप जीप संशयितरीत्या खडकी परिसरात आढळून आली. त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यामध्ये विमल गुटखा व सुगंधित तंबाखूची बेकायदेशीर वाहतूक करत असल्याचे अढळून आले. याप्रकरणी दोन जणांविरोध गुन्हा दाखल करून त्यांना व २७ पोत्यांमधील १८ लाख ८८ हजार रुपये किमतीचा गुटखा, सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ ताब्यात घेतले आहे.
रावणगाव येथील पोलिस मदत केंद्रातील पोलिस हवालदार गोरख एकनाथ मलगुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बुधवारी (ता. २१) पहाटे पाचच्या सुमारास हवालदार मलगुंडे, बी. आर. मंडगर, पोलिस नाईक एन. एस. भागवत, एस. टी. डाळ, सहायक फौजदार एस. एम. शिंदे, पोलिस नाईक एम. एम. पवार यांचे पथक पुणे- सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर स्वामी चिंचोली (ता. दौंड) गस्त घालत होते. यावेळी पथकाला महामार्गावरून सोलापूर बाजूकडून पुण्याकडे बाजूकडे जाणारा एक महेंद्र बोलेरो पिकअप जीपबाबत (क्र. एमएच १२ क्यूजी १०४३) संशय आल्याने त्यास थांबण्याचा इशारा केला. मात्र, सदरचा पिकअप न थांबल्याने पथकाने पाठलाग केला.
याबाबत कुरकुंभ पोलिस मदत केंद्रातील कर्मचाऱ्यांना कळविले. त्यांनीही पिकअप कुरकुंभ येथे थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, चालकाने पिकअप वळून पुन्हा भरधाव सोलापूर बाजूकडे नेला. त्यानंतर पोलिस पथकाने पिकअप खडकी येथे महामार्गालगतच्या ‘हॉटेल आकांक्षा’समोरील मोकळ्या जागेत थांबवून चालक नामदेव मधुकर लवटे (वय २७, रा. निजामपूर, कोकरे मळा, ता. सांगोला, जि. सोलापूर) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे वाहनातील मालाची चौकशी केली; तर उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी पिकअप तपासणी केली. त्यामध्ये गोण्या दिसून आल्या. त्यामध्ये विमल गुटखा अढळून आला. सदर चालकास गुटखा कोठून आणल्याचा विचारला. हा गुटखा पिकअपमध्ये बाजूला बसलेले दत्तात्रेय पांडुरंग खांडेकर (रा. खैराव, सिद्धोबा मंदिराजवळ, ता. जत. जि. सांगली) यांचा असल्याचे सांगितले.
याबाबत खांडेकर याच्याकडे अधिक चौकशी केल्यास त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. याबाबत पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांना माहिती दिली. सदरचे पिकअप, चालक व मालकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून पिकअप जीप, विमल गुटखा, सुगंधित तंबाखूजन्य पदार्थ, असा एकूण १८ लाख ८८ हजारांचा मुद्देमाल ताब्यात घेतला. याप्रकरणी पोलिसांनी पिकअप चालक नामदेव मधुकर व गुटखा मालक दत्तात्रेय पांडुरंग खांडेकर याच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला.

Web Title: Todays Latest District Marathi News Kur22b00464 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..