डंपरची धडक बसल्याने जिरेगावात ज्येष्ठ जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डंपरची धडक बसल्याने
जिरेगावात ज्येष्ठ जखमी
डंपरची धडक बसल्याने जिरेगावात ज्येष्ठ जखमी

डंपरची धडक बसल्याने जिरेगावात ज्येष्ठ जखमी

sakal_logo
By

कुरकुंभ, ता. २२ : दौंड तालुक्यातील जिरेगाव-वासुंदे रस्त्यावरून भरधाव खडी वाहतूक करणाऱ्या डंपरची धडक बसल्याने ज्येष्ठ नागरिक जखमी झाला.
जिरेगाव-वासुंदे रस्त्यावरून गेल्या काही दिवसांपासून खडीची अवजड वाहतूक रात्रंदिवस होत आहे. शनिवारी (ता. १७) रात्री साडेसातच्या सुमारास सदाशिव साहेबराव मचाले (वय ६५, रा. जिरेगाव, जाधववाडी-हनुमाननगर) हे मुलगा संतोष मचाले याच्या रस्त्यालगत चालू असलेल्या फरसाण कारखान्याच्या कामावर जेवण घेऊन पायी जात असताना पाठीमागून आलेल्या अज्ञात पांढऱ्या रंगाच्या खडी वाहतूक करणाऱ्या डंपरने धक्का दिल्याने जखमी झाले. त्यांना उपचारासाठी प्रथम कुरकुंभ येथील खासगी रूग्णालयात नेले. त्यानंतर दौंड येथील खासगी रूग्णालयात नेण्यात आले.
दरम्यान, परिसरातून धोकादायकरीत्या व भरधाव अवजड वाहतूक होत असून, काही वाहनचालक दारूच्या नशेत वाहने चालवत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. यासंदर्भात जखमी सदाशिव मचाले यांनी पोलिसात फिर्याद दिली. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात वाहन व चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Kur22b00465 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..