बळजबरीने बलात्कार करणाऱ्या हॉटेल मालकाविरोधात गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बळजबरीने बलात्कार करणाऱ्या हॉटेल मालकाविरोधात गुन्हा
बळजबरीने बलात्कार करणाऱ्या हॉटेल मालकाविरोधात गुन्हा

बळजबरीने बलात्कार करणाऱ्या हॉटेल मालकाविरोधात गुन्हा

sakal_logo
By

कुरकुंभ, ता. २९ : दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथील एका हॉटेल मालकाने एका २६ वर्षीय महिलेला नोकरी देण्याचे आमिष दाखवून बळजबरीने बलात्कार केला व याबाबत कोणाला सांगितल्यास ''तुझे अश्लील फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची आणि जीवे मारून उजनी धरणात टाकून देईल'' अशी देण्याची धमकी दिली. हॉटेल मालक त्याची पत्नी व मुलाविरूध गुन्हा दाखल केला आहे.
पिढीत महिलेला स्टेशनवर भेटल्यानंतर कुरकुंभ येथील हॉटेल कुबेरचे मालक प्रवीण ठकुरे याने, ''माझ्या हॉटेलमध्ये मॅनेजरचे काम देतो, खाणे राहण्याची व्यवस्था करून २० हजार रुपये पगार देतो, असे सांगून मोबाईल नंबर घेतला. त्यानंतर दोघांचे मोबाईलवरती संभाषण होऊन पिढीत महिला कुरकुंभ येथे कामाला आली. त्यानंतर हॉटेल मालकाने पिढीत महिलेला २१ मार्च २०२२ रात्री कुबेर हॉटेलमध्ये आणून आराम करण्यास सांगितले. मार्चला यावेळी सर्दी झाल्याने ठकुरे यांनी पिढीतेला लिंबू सरबत कोल्ड्रीग्स दिले. ते पिल्यानंतर पीडितेला झोप लागली. मात्र दुसऱ्या दिवशी तिला बलात्कार झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर ठकुरे हॉटेलवर येऊन अश्लील फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली. त्याठिकाणी प्रवीण ठकुरे, त्यांची पत्नी प्रगती व मुलगा प्रथमेश होता. त्यांनीही पीडितेला जिवे मारून उजनी धरणात फेकून देण्याची धमकी दिली.