खडकीत मोटारीच्या काचा फोडून सात लाखांच्या दागिन्यांची चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

खडकीत मोटारीच्या काचा फोडून सात लाखांच्या दागिन्यांची चोरी
खडकीत मोटारीच्या काचा फोडून सात लाखांच्या दागिन्यांची चोरी

खडकीत मोटारीच्या काचा फोडून सात लाखांच्या दागिन्यांची चोरी

sakal_logo
By

कुरकुंभ, ता. २५ : खडकी (ता. दौंड) येथे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या हॉटेल शौर्यवाडा पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या मोटारीच्या काचा भरदुपारी दोन चोरट्यांनी फोडल्या व सिटावरील ६ लाख ८२ हजार ५०० रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी लांबविल्या. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुणे येथून सुशील शरणाअप्पा होसमणी (रा. ११०६ आदित्य मल्हार सोसायटी, शिंदेवस्ती, रावेत, पुणे) हे कुटुंबीयांसह मोटारीने रविवारी (ता. २३) दुपारी पुणे-सोलापूर महामार्गावरून सोलापूरकडे जात होते. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास होसमणी कुटुंब खडकी येथील शौर्यवाडा हॉटेल येथे जेवण करण्यासाठी थांबले होते. दरम्यान, सव्वा चारच्या सुमारास जेवण झाल्यानंतर गाडीकडे गेले असता चालकाच्या मागील दरवाजाची काच फोडून सिटावरील पर्स चोरीला गेल्याचे लक्षात आले. त्यात मंगळसूत्र, अंगठ्या, इत्यादी सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे सात लाख रुपयांचा ऐवज चोरीला गेला. हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये दुचाकीवरून आलेल्या दोघांपैकी एकाने गाडीची काच फोडून दागिन्यांची चोरी केल्याचे आढळून आले. पुढील तपास पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत.