स्वामी चिंचोली येथे गोमांसासह टेम्पो जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वामी चिंचोली येथे
गोमांसासह टेम्पो जप्त
स्वामी चिंचोली येथे गोमांसासह टेम्पो जप्त

स्वामी चिंचोली येथे गोमांसासह टेम्पो जप्त

sakal_logo
By

कुरकुंभ, ता. ९ : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे मंगळवारी (ता. ८) दुपारी एका टेंपोत प्लास्टिक ड्रममध्ये गाई व बैलाचे मांस घेऊन टेम्पोत घेऊन जाणाऱ्या चालकास ताब्यात घेतले. मांस व टेम्पो, असा ३ लाख ४४ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित बाळासाहेब असवले (वय २९, रा. टाकवे बुद्रुक, ता. मावळ) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, स्वामी चिंचोली येथे पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगतच्या एका हॉटेलसमोर टेंपोमध्ये (क्र. एमएच ०३ ओव्ही ८५४९) प्लास्टिक ड्रममध्ये गाई व बैलाचे मांस कोणत्याही परवानगीशिवाय बेकायदेशीर वाहतूक करीत असल्याचे निदर्शनास आले. या ड्रममध्ये ९०० किलो मांस किंमत ४४ हजार रुपये, टेंपो किंमत ३ लाख रुपये, असा एकूण ३ लाख ४४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलिसांनी टेंपोचालक इमान नासीर शेख (वय ३८, रा. शहापूर चाळ, सोलापूर) व जनावरांची कत्तल करणारे, मांस विकत घेणारे यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल केला. याबाबतचा पुढील तपास पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी करीत आहेत.