कुरकुंभ येथील हॉटेलसमोर
वाहनाची काच फोडून चोरी

कुरकुंभ येथील हॉटेलसमोर वाहनाची काच फोडून चोरी

कुरकुंभ, ता. १७ : कुरकुंभ (ता. दौंड) येथे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून जाणारे प्रवासी जेवणासाठी हॉटेलला थांबले असता गुरुवारी (ता. १६) भर दुपारी त्यांच्या चारचाकी वाहनाची चोरट्यांनी काच फोडून आतमधील लॅपटॉप आणि सोन्याचा गंठण, असा ९६ हजारांचा मुद्देमाल लांबविला.
पुणे-सोलापूर महामार्गावरून प्रवास करणारे हरिश विठ्ठल गडदे (रा. नांदेड सिटी, सिंहगड रोड, पुणे) हे गुरुवारी दुपारी पावणेदोनच्या सुमारास कुरकुंभ येथील ‘चर्तुर्थी हॉटेल’ येथे जेवण करण्यास थांबले. यावेळी त्यांनी चारचाकी वाहन (क्र. एम.एच. १२ एन.ई. १५७०) हॉटेलसमोर लावून ते जेवण करण्यासाठी हॉटेलमध्ये गेले. जेवण झाल्यानंतर वाहनाकडे आले असता चोरट्याने वाहनाची काच फोडून चालकाच्या बाजूच्या सीटवरील लॅपटॉप, सोन्याचा गंठण व काही महत्त्वाची कागदपत्रे, असा एकूण ९६ हजार ४२४ रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी हरिश गडदे यांनी पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com