कांद्याच्या अनुदानामुळे दिलासा : वासुदेव काळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कांद्याच्या अनुदानामुळे
दिलासा : वासुदेव काळे
कांद्याच्या अनुदानामुळे दिलासा : वासुदेव काळे

कांद्याच्या अनुदानामुळे दिलासा : वासुदेव काळे

sakal_logo
By

कुरकुंभ, ता. १६ : राज्यातील अडचणीत असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नियुक्त केलेल्या समितीने प्रति क्विंटल २०० रुपये सानुग्रह अनुदान देण्याची शिफारस केलेली असताना राज्य सरकारने मात्र आणखी १०० रुपये वाढून ३०० रुपये प्रति क्विंटल सानुग्रह अनुदान देण्याची घोषणा जाहीर केल्याबद्दल शिंदे-फडणवीस सरकार हे बळीराजाच्या पाठीशी असल्याचे सिद्ध झाले असून, या सरकारचे शेतकरी व भाजप किसान मोर्चाच्यावतीने प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे यांनी आभार मानले.
नाकर्त्या व भ्रष्ट ठाकरे सरकारच्या अडीच वर्षांच्या कालावधीत राज्यातील शेतकऱ्यांसमोर समस्यांचा डोंगर उभा होता. नैसर्गिक आपत्ती, नापिकीसारख्या समस्यांनी ग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांची केवळ पोकळ आश्वासनांवर बोळवण करणारे तेव्हाचे सत्ताधारी आज शेतकऱ्यांचे कैवारी असल्याचा केवळ कांगावा करीत आहेत. आता आपले प्रश्न मार्गी लागतील, या खात्रीमुळेच शेतकरी शिंदे-फडणवीस सरकारकडे आशेने पाहात आहे, असा टोलाही काळे यांनी लगावला. विरोधकांनी कांद्याच्या मुद्द्यावरून केवळ आणि केवळ राजकारण चालविले असून, अशा स्वार्थी राजकारणात बळीराजाची होरपळ होऊ देऊ नका, असे आवाहनही काळे यांनी विरोधकांना केले.