एसटीतून महिलेच्या बॅगेतील दागिने लंपास | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

एसटीतून महिलेच्या बॅगेतील दागिने लंपास
एसटीतून महिलेच्या बॅगेतील दागिने लंपास

एसटीतून महिलेच्या बॅगेतील दागिने लंपास

sakal_logo
By

कुरकुंभ, ता. ६ : मनमाड- बंगळूरू राष्ट्रीय महामार्गावर कुरकुंभ - दौंडदरम्यान ३० एप्रिल रोजी एसटी प्रवासात एका महिलेच्या बॅगेतून ४ लाख २५ रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. पाच दिवसानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
मनमाड- बंगळूरू महामार्गावर ३० एप्रिल २०२३ रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास कुरकुंभ-दौंड दरम्यानच्या एसटी प्रवासामध्ये नीता बंडू डोंबाळे (रा. नानवीज, ता. दौंड जि. पुणे) या महिलेच्या बॅगेतील साडेआठ तोळे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेले. या दागिन्यांची किंमत ४ लाख २५ हजार रुपये आहे. यासंदर्भात नीता डोंबाळे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना ३० एप्रिलला घडली मात्र गुन्हा ५ मेला दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरूध गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक फौजदार श्रीरंग शिंदे करीत आहेत.