
पूर्व हवेलीतील रस्ते ओस
लोणी काळभोर, ता. ३० : गेल्या काही दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे उन्हाची तीव्रता कमी झाली होती. अशात गुरुवारपासून पुन्हा एकदा उन्हाचा चटका पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, उरुळी कांचनसह परिसरातील नागरिकांना सहन करावा लागत असल्याने परिसरामध्ये दुपारच्यावेळेत नागरिकांची वर्दळ कमी झाल्याने रस्ते ओस पडू लागले आहेत.
उन्हाने रस्ते तापत असल्याने प्रवास करताना उन्हाच्या झळांनी नागरिक भाजून निघत आहेत. सकाळी नऊ वाजल्यापासूनच उन्हाचा तडाखा बसत असून संध्याकाळी साडेसहापर्यंत गरम झळांचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे.
लोणी काळभोर व उरुळी कांचनचे सरासरी किमान तापमान २० अंश सेल्सिअस, तर कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअसपर्यंत पोचले आहे. एप्रिल महिना संपत असतानाच आत्तापासून उन्हाची तीव्रता जाणवते आहे. दुपारी बाजारपेठेत फारसे ग्राहक नसल्याचे दिसून येत आहे. तर ग्राहक संध्याकाळीच खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. तर कामानिमित्त बाहेर असलेल्या नागरिकांकडून उपरणे, टोपी, रुमाल आदीच्या माध्यमातून उन्हापासून बचाव केला जात आहे.
Web Title: Todays Latest District Marathi News Lnk22b03294 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..