पुणे १५ मोटारसायकल चोरी करणाऱ्या चोरांना अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune bike thief arrested
दोन मोटारसायकल चोरांना अटक गुन्हे शाखा युनिट ६ची वाघोली येथे कारवाई

पुणे : १५ मोटारसायकल चोरी करणाऱ्या चोरांना अटक

लोणी काळभोर : पुणे शहर व ग्रामीण पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून तीन लाख रुपयांच्या १५ मोटारसायकल चोरी करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना गुन्हे शाखा युनिट सहाच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नीलेश बाळासाहेब शिवरकर (वय ३३, रा. आळंदी म्हातोबाची, ता. हवेली) व प्रशांत संपत चव्हाण (वय ३४, रा. निमगाव म्हाळुंगी, ता. शिरूर) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

या गुन्ह्याचा तपास करत असताना शुक्रवारी गुन्हा करणारे आरोपी वाघोली बाजारतळ येथे येणार असल्याची बातमी पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार, गुन्हे शाखा युनिट ६चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश माने व पथकाने वाघोली बाजारतळ येथे सापळा रचून वरील दोघांना मोटारसायकलसह ताब्यात घेतले. त्यांच्याकडे मोटारसायकलबाबत विचारपूस केली असता, त्यांनी ती आळेफाटा येथून चोरून आणल्याचे सांगितले. दोघांनाही न्यायालयात हजर करून न्यायालयाने मंगळवार पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, त्यांच्याकडे तपास करताना त्यांनी पुणे शहरातील हडपसर, चंदननगर, लोणीकंद, कोंढवा, कोथरूड, यवत, आळेफाटा या पोलिस ठाण्यांच्या हद्दीतून ३ लाख रुपयांच्या १५ मोटारसायकल चोरल्याची कबुली दिली.

Web Title: Todays Latest District Marathi News Lnk22b03302 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top