कदमवाकवस्ती येथे अपघातात दोनजण ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कदमवाकवस्ती येथे अपघातात दोनजण ठार
कदमवाकवस्ती येथे अपघातात दोनजण ठार

कदमवाकवस्ती येथे अपघातात दोनजण ठार

sakal_logo
By

लोणी काळभोर, ता. ६ : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथे झालेल्या अपघातात दोनजण ठार झाले, तर दोनजण जखमी झाले. गुरुवारी (ता. ६) रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास ‘हॉटेल ग्रँड इलेव्हन’जवळ हा अपघात झाला.
या अपघातात सुनील भीमराव पवार (वय ४०, रा. फुलचिंचोली, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) व ओमकार दत्तात्रेय पाळेकर (वय २३, रा. दहीवळी, ता. माढा, जि. सोलापूर) यांचा मृत्यू झाला. तर, मंगेश बंकट खोचरे व सर्फराज खलीद जहागीरदार हे जखमी झाले. याबाबत रोहीत शंकर गोसावी (वय १७, रा. दहीवळी) याने लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहीवळी येथून रोहीत गोसावी, मंगेश खोचरे, सर्फराज जहागीरदार, ओमकार पाळेकर हे गुलटेकडी (पुणे) येथे कलिंगड विकण्यासाठी निघाले होते. कदमवाकवस्ती येथे गुरुवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास आले असता पिकअपच्या पुढे असलेल्या मोटारीला पिकअपचा धक्का लागला. त्यामुळे मोटारीतील व पिकअपमधील सर्वजण खाली उतरून वाहनांचे काय नुकसान झाले, याची पाहणी करू लागले.
यावेळी रोहीत गोसावी हा लघुशंकेसाठी बाजूला गेला. मात्र, त्यावेळी रस्त्यावर मोठा आवाज आला म्हणून त्याने मागे जाऊन पाहिले असता पाठीमागून येणाऱ्या एका सिमेंटच्या ट्रकने पिकअपला व मोटारीला पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यात पिकअप चालक ओमकार पाळेकर, मंगेश खोचरे, सर्फराज जहागीरदार हे जखमी झाले. त्यांना लोणी काळभोर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, ओमकार पाळेकर याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तसेच, मोटार चालक सुनील पवार यास गंभीर दुखापत होऊन त्यास ससून रुग्णालयात दाखल केले असता त्याचाही उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
दरम्यान, पुणे-सोलापूर महामार्गावर आठ दिवसांत ३ मोठे अपघात झाले आहेत. त्यामध्ये ५ जणांनी आपला जीव गमावला आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Lnk22b03307 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top