परप्रांतीय तरुणाकडून मुलीचा विनयभंग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

परप्रांतीय तरुणाकडून मुलीचा विनयभंग
परप्रांतीय तरुणाकडून मुलीचा विनयभंग

परप्रांतीय तरुणाकडून मुलीचा विनयभंग

sakal_logo
By

लोणी काळभोर, ता. ६ : मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या आई व तिच्या १३ वर्षांच्या मुलीला पाहून तिचा विनयभंग व पाठलाग केल्याचा प्रकार शुक्रवारी (ता. ६) सकाळी लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील कोळपे वस्ती येथील रेल्वे ब्रिजवर घडला.

दिलीप राजू थापा (वय २६, रा. रामदरा रोड, अंबरनाथ मंदिराजवळ, ता. हवेली, मूळ रा. घाटगाव- नेपाळ) असे त्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी मनीषा प्रवीण जाधव (वय ३६, रा. साईराज पार्क, लोणी काळभोर) यांनी फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी पाऊणे सहा वाजण्याच्या सुमारास मनीषा जाधव व त्यांची मुलगी मॉर्निंग वॉकसाठी रामदरा रोडकडे घरातून गेल्या होत्या. घरी परत येताना कोळपेवस्तीवरील रेल्वे ब्रिजवर २२ ते २३ वर्ष वयोगटातील एक तरुण येताना दिसला. त्याने हिंदी भाषेत मुलीला उद्देशून विनयभंग केला. त्यानंतर कोयता घेऊन दोघींचा पाठलाग गेला. दरम्यान, सदर व्यक्तीस कोयत्यासह ताब्यात घेतले आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Lnk22b03309 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top