
वडापावलाही महागाईची झळ
लोणी काळभोर, ता. १० : मध्यमवर्गीय, चाकरमान्यांच्या पोटाला आधार देणाऱ्या वडापावलाही महागाईची झळ बसली आहे. बाजारात डाळ, तेल, गॅस महाग झाल्याने साधारणतः १२ रुपयांना मिळणारा वडापाव १५ ते २० रुपयांना मिळू लागला आहे.
लॉकडाउननंतर बाजारात सर्वच वस्तूंच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे. वडापाव बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्चा मालाच्या किमती वाढल्या आहेत. त्यामुळे वडापाव आता असलेल्या किमतींमध्ये विकणे परवडेनासे झाले आहे. त्यामुळे वडापावचे दर वाढवण्यात येत आहेत. इंधन, तेल आणि आता गॅसही महागला आहे. मागील सहा महिन्यापूर्वी १ लिटर तेलासाठी ९० ते १०० रुपये मोजावे लागत होते. तेच आता १७० ते १८० रुपये द्यावे लागतात. म्हणजेच ही भाववाढ दुपटीने झालीय. बेसन पीठ, मसाल्याचे पदार्थदेखील महागले आहेत. त्यामुळे वडापावचे भाव वाढले आहेत.
तेलाच्या, गॅसच्या व इतर वस्तूंच्या किमती वाढल्यामुळे वडापावचीदेखील किंमत वाढवावी लागली. इतर वस्तूंच्या तुलनेत ही भाववाढ नगण्य स्वरूपाची असल्याने ग्राहकांवर त्याचा काही जास्त परिणाम दिसून आला नाही. तरीही नागरिकांचा वडापाव खाण्याकडे मोठा कल आहे. ग्राहकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे.
गणेश काटवटे, विक्रेते, लोणी स्टेशन, कदमवाकवस्ती, (ता. हवेली)
Web Title: Todays Latest District Marathi News Lnk22b03311 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..