दिवेघाटात दांपत्यास चौघांकडून मारहाण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दिवेघाटात दांपत्यास
चौघांकडून मारहाण
दिवेघाटात दांपत्यास चौघांकडून मारहाण

दिवेघाटात दांपत्यास चौघांकडून मारहाण

sakal_logo
By

लोणी काळभोर, ता. ११ : हडपसर-सासवड महामार्गावर दिवे घाटात काहीही कारण नसताना अज्ञात २० ते २२ वयोगटातील चौघांनी एकाला भरदिवसा लोखंडी रॉड, हाताने मारहाण करून जखमी केले. ही घटना मंगळवारी (ता. १०) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली. नीलेश प्रभाकर भोसुरे (वय ३५, रा. ४५, ओ, पाचवा मैल, धर्मनगर, वडगावशेरी, पुणे) असे मारहाण झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नीलेश व त्यांची पत्नी कविता हे आईवडिलांना भेटण्यासाठी नीरा (ता. पुरंदर) या गावी दुचाकीवरून चालले होते. त्यावेळी दिवे घाटात पावणेअकराच्या सुमारास पाठीमागून दोन दुचाकीवरील चौघे गाडीजवळ आले. त्यांनी त्यांची दुचाकी यांच्या आडवी मारली व पुढे बसलेल्या व्यक्तीने शिवीगाळ करुन गाडी थांबविण्यास सांगितले. त्यामुळे गाडी थांबवली. मात्र, या दोन्ही व्यक्तींनी नीलेश यांना हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दुसऱ्या दुचाकीवरील दोघे खाली उतरले. त्यांनी लोखंडी रॉडने नीलेश यांच्या डावे हातावर व डावे पायावर मारहाण केली. तसेच, मागे बसलेल्या व्यक्तीने कविता यांच्या डाव्या खांद्यावर लोखंडी रॉडने मारहाण केली. त्यानंतर एक गाडी हडपसर बाजूला व एक गाडी सासवड बाजूस निघून गेली.
दरम्यान, नीलेश यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना सासवड येथील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. याप्रकरणी कविता नीलेश भोसुरे (वय ३४) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात अज्ञात चौघांविरोधात तक्रार दिली आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Lnk22b03312 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top