पंक्चरच्या दरात ३० टक्के वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पंक्चरच्या दरात 
३० टक्के वाढ
पंक्चरच्या दरात ३० टक्के वाढ

पंक्चरच्या दरात ३० टक्के वाढ

sakal_logo
By

लोणी काळभोर, ता. १२ : पुणे-सोलापूर महामार्ग व पुणे-नगर महामार्गावरील टायर पंक्चर असोसिएशनने दुचाकी वाहन व व्यावसायिक वाहन पंक्चर काढणे, टायर ट्यूब बदलणे, रिमोल्ड करणे आदी कामांच्या दरात सुमारे ३० टक्के दरवाढ केल्याची माहिती दोन्ही रोडच्या असोसिएशनचे पदाधिकारी सुकू सदानंद पणीकर व सतीश पणीकर यांनी दिली.
कुंजीरवाडी (ता. हवेली) येथे १ मे रोजी टायर पंक्चर असोसिएशनच्या सभासदांची बैठक पार पडली. या बैठकीला ८५ सभासद हजर होते. यामध्ये टायर पंक्चर व अन्य कामासाठी सुमारे ३० टक्के दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही दरवाढ १० मेपासून लागू केली आहे. ट्यूबलेस टायर व चारचाकी वाहन पंक्चर काढणे दरात कुठलीही दरवाढ केलेली नाही. ही दरवाढ सन २०१७ नंतर केली आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Lnk22b03315 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top