डॉ. नितीन वाघमारे यांना पी. एचडी प्रदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

डॉ. नितीन वाघमारे यांना पी. एचडी प्रदान
डॉ. नितीन वाघमारे यांना पी. एचडी प्रदान

डॉ. नितीन वाघमारे यांना पी. एचडी प्रदान

sakal_logo
By

लोणी काळभोर, ता. १३ : कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील (लोणी स्टेशन) येथील अंकुर बालरुग्णालयाचे संचालक डॉ. नितीन रामचंद्र वाघमारे यांना नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातील आयुर्वेदामधील पी. एचडी पदवी प्रदान करण्यात आली.
डॉ. वाघमारे यांनी आरोग्य विज्ञान विद्यापीठात आयुर्वेदामधून ‘कौमारभृत्य- बालरोग’ हा विषय निवडला होता. या विषयातून ‘नवजातशिशू कामलेच्या व्यवस्थापनात दार्वी स्वरसाचा क्लिनिकल अभ्यास’ हा शोधप्रबंध सादर केला होता. या शोधप्रबंधासाठी वाघमारे यांना पुण्यातील अष्टांग आयुर्वेद महाविद्यालयाच्या डॉ. प्रा. मीरा एम. परांजपे यांचे मार्गदर्शन लाभले.
दरम्यान, पुणे महापालिकेच्या वतीने वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात कामगिरी केल्याबद्दल डॉ. नितीन वाघमारे यांचा सन्मान करण्यात आला.
२६५४

Web Title: Todays Latest District Marathi News Lnk22b03316 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top