लोणी काळभोरमध्ये पकडला गावठी दारु वाहतुकीचा टेम्पो | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

लोणी काळभोरमध्ये पकडला 
गावठी दारु वाहतुकीचा टेम्पो
लोणी काळभोरमध्ये पकडला गावठी दारु वाहतुकीचा टेम्पो

लोणी काळभोरमध्ये पकडला गावठी दारु वाहतुकीचा टेम्पो

sakal_logo
By

लोणी काळभोर, ता. १३ : दारू वाहतूक करणारा टेम्पो राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र. दोनच्या पोलिसांनी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर शुक्रवारी (ता. १३) सकाळी लोणी काळभोर (ता. हवेली) येथे थरारक पाठलाग करून पकडला. त्यावरून दारू भट्टीवर केलेल्या कारवाईत १ लाख ४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी टेम्पोचालक रामकिशन गणेशराम प्रजापती (वय २२, रा. दत्तवाडी-उरूळी कांचन, ता. हवेली, मूळ रा. मध्यप्रदेश) व राधेश्याम हरीराम प्रजापती (वय ३२, रा. मॉरीस बेकरीजवळ, काळेपडळ, पुणे) यांना अटक केली. शुक्रवारी सकाळी राज्य उत्पादन शुल्कच्या भरारी पथक क्रमांक दोनचे निरीक्षक पुणे-सोलापूर महामार्गावर गस्त घालीत होते. त्यावेळी लोणी काळभोर परिसरात एक टेम्पो संशयीतरित्या जात असताना आढळून आला. पोलीस दिसल्याने टेम्पो चालकाने टेवेग वाढवला. त्यामुळे पोलिसांनी पाठलाग करून टेम्पो अडवला. टेम्पोची तपासणी केली असता त्यामध्ये ३५ लीटर क्षमतेचे २० कॅन गावठी दारूने भरलेले आढळून आले.
त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सदर दारू राधेश्याम याच्या लोणी काळभोर परीसरातील मुळा नदीकाठी असलेल्या दारू निर्मिती केंद्रावरून आणल्याचे सांगितले. त्यानुसार सर्व पथकाने त्या ठिकाणी जाऊन छापा टाकला असता २ हजार लिटर रसायन, २४५ लीटर गावठी दारू, २०० किलो गुळ, अंदाजे २०० किलो सरपन, २ ॲल्युमिनिअम थाळ्या व चाटू, लोखंडी बॅरल, प्लॅस्टिक कॅन व गावठी दारू तयार करण्याकरिता लागणारे इतर साहित्य, असा १ लाख ४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल नष्ट केला. तसेच, ४ लाख रुपयांचा टेम्पो जप्त केला.

Web Title: Todays Latest District Marathi News Lnk22b03318 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top