पेट्रोल टाकून पेटविल्याने पत्नी जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पेट्रोल टाकून पेटविल्याने पत्नी जखमी
पेट्रोल टाकून पेटविल्याने पत्नी जखमी

पेट्रोल टाकून पेटविल्याने पत्नी जखमी

sakal_logo
By

लोणी काळभोर, ता. २८ ः वडील व मुलाच्या भांडणात पत्नी मध्ये का पडली, म्हणून शिवीगाळ करून पतीने पत्नीवर पेट्रोल टाकून पेटवून दिल्याची घटना देवाची उरुळी (ता. हवेली) येथे घडली.

मीनाक्षी सोमनाथ वाघमोडे (वय ४५, रा. देवाची उरुळी, मंतरवाडी) असे पेटवून दिलेल्या महिलेचे नाव आहे. या घटनेमध्ये सदर महिलेच्या तोंडाला, हाताला,कानाला, व छातीला भाजले आहे.
मीनाक्षी वाघमोडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार लोणी काळभोर पोलिस ठाण्यात पतीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मीनाक्षी वाघमोडे या पती सोमनाथ वाघमोडे व मुलगा शेखर यांच्यासोबत देवाची उरुळी या ठिकाणी राहतात. चावी मागण्याच्या कारणावरून सोमनाथ यांनी शेखर यास शिवीगाळ करून मारहाण केली. शेखर बाहेर गेल्यानंतर सोमनाथ यांनी एका बाटलीमध्ये पेट्रोल आणले. ते मीनाक्षी यांच्या अंगावर टाकून काडीपेटीतील काडी पेटवून अंगावर टाकली. त्यामुळे अंगावरील कपड्यांनी पेट घेतला. सोमनाथ घराला कडी लावून त्या ठिकाणावरून निघून गेले.
दरम्यान, मीनाक्षी यांनी मोठमोठ्याने आरडाओरडा केल्याने शेजारी राहणाऱ्या लोकांनी घराची कडी उघडली व अंगावर पाणी टाकून आग विझविली. मीनाक्षी यांना पुढील उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Lnk22b03333 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top