
करीत असतील अथवा तुमच्या घरातील व्यक्तींचे,
लोणी काळभोर, ता. २९ : चारचाकी वाहनातून आलेले अनोळखी व्यक्ती तुमच्या नातेवाईकांची नावे सांगून घरात घुसण्याचा प्रयत्न करीत असतील अथवा तुमच्या घरातील व्यक्तींचे, नातेवाईकांचे नाव सांगून तुम्हाला बोलण्यात गुंतवत असतील तर सावधान... अशा लोकांच्याकडून तुम्ही लुटले जाऊ शकता अथवा तुमची लुबाडणूकही होऊ शकते. कारण असे ''व्हाइट कॉलर'' चोर सध्या लोणी काळभोर, कदमवाकवस्तीसह पूर्व हवेलीत सुळसुळाट आहेत.
कदमवाकवस्ती येथील एका नागरिकाने या टोळीजवळ असलेल्या चारचाकी गाडीचे फुटेज काढले असून त्यातील एक माणूस हा कुरळ्या केसाचा आहे. तो झब्बा कुर्ता घालतो आहे. व्हाइट कॉलरच्या ५ जणांची टोळी चारचाकी गाडीत येऊन दिवसा घरांची रेकी करीत असल्याचे निदर्शानास आले आहे. तसेच पैसे किंवा धान्याची मागणी करण्यासाठी अचानक घरात घुसतात व नागरिकांना हिप्नोटाईझ करतात.गुंगीच्या औषधाच्या स्प्रेचा वापर करून लुटतात.
पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाट, संभाजीनगर, परिसरात ही टोळी सक्रिय झाली असून ही टोळी घरातील जबाबदार व्यक्तीची नावे सांगून तुमच्याकडून पैसे किंवा धान्यांची मागणी करण्यासाठी अचानक घरात घुसतात. त्यांचा पेहराव व बोलीभाषा याची नागरिकांना भुरळ पडत असून नागरिक त्यांच्या या बोलीभाषेला बळी पडत आहेत.
कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन
काही नागरिकांना या टोळीजवळ असलेल्या इंडिका जेष्ट (एम.एच ४२.ए.एच.५७७९) ही चारचाकी गाडीचे सीसीटीव्ही फुटेज आढळून आले आहेत. परंतु, सुदैवाने आतापर्यंत कोणतीही मोठी घटना घडली नाही. तरी पूर्व हवेलीतील नागरिकांनी आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याचे आवाहन कदमवाकवस्ती येथील राहुल काळभोर यांनी ''सकाळ'' शी बोलताना सांगितले
Web Title: Todays Latest District Marathi News Lnk22b03364 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..