समाज सुधारकांच्या विचारांचा जागर व्हावा : चौगुले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

समाज सुधारकांच्या विचारांचा जागर व्हावा : चौगुले
समाज सुधारकांच्या विचारांचा जागर व्हावा : चौगुले

समाज सुधारकांच्या विचारांचा जागर व्हावा : चौगुले

sakal_logo
By

लोणी काळभोर, ता. २९ : थोर समाज सुधारकांची जयंती साजरी करताना डीजेच्या तालावर होणारा धांगड धिंगाणा न करता समाज सुधारकांच्या विचारांचा जागर व्हावा. त्यांचे चरित्र समजून घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन लोणी काळभोर ठाण्याच्या पोलिस उपनिरीक्षक प्रियंका चौगुले यांनी केले.
लोणी काळभोर (ता. हवेली) येथील विश्वरत्न फौडेशनने आयोजित करण्यात आलेल्या शाहू, फुले, आंबेडकर या विषयावरील तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ व गरजूंना शालोपयोगी वस्तू वाटप कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून त्या बोलत होत्या. याप्रसंगी त्यांना पृथ्वीराज कपूर मेमोरिअल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील विद्यार्थ्य्यांशी त्यांनी संवाद साधला.
या वेळी पृथ्वीराज कपूर मेमोरिअल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य सीताराम गवळी, पोलिस पाटील प्रियांका भिसे, शिवसेना जिल्हा संघटक रमेश भोसले, नितीन लोखंडे, फौंडेशनचे अध्यक्ष विजय ननवरे, विश्वस्त तुळशीराम घुसाळकर, अमित गायकवाड, कालिदास काळभोर, लक्ष्मण चव्हाण, निजाम तांबोळी उपस्थित होते.

स्पर्धेचा सविस्तर निकाल
लहान गट - प्रथम क्रमांक - ओंकार काळे (पृथ्वीराज कपूर मेमोरिअल हायस्कूल, लोणी काळभोर), द्वितीय क्रमांक - अपूर्वा चंद (मुक्ताई मेमोरिअल स्कूल, कुंजीरवाडी), तृतीय क्रमांक - रेणुका काळभोर मुक्ताई मेमोरिअल स्कूल, कुंजीरवाडी), चतुर्थ क्रमांक - संकल्प गोयल (न्यू इंग्लिश स्कूल, फुरसुंगी). 

मोठा गट - प्रथम क्रमांक - यशराज सुरवसे (पृथ्वीराज कपूर मेमोरिअल हायस्कूल, लोणी काळभोर), द्वितीय क्रमांक - सुरक्षा गोडगे (मुक्ताई मेमोरिअल स्कूल, कुंजीरवाडी), तृतीय क्रमांक - अथर्व मोरे (न्यू इंग्लिश स्कूल, लोणी काळभोर), चतुर्थ क्रमांक - मनस्वी काळभोर (रेनबो इंटरनॅशनल स्कूल, कदमवाकवस्ती) कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बोरकर यांनी केले तर उपस्थितांचे आभार महेश खुळपे यांनी मानले.

Web Title: Todays Latest District Marathi News Lnk22b03366 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top