बनावट सौदर्य प्रसाधनांच्या गोडाऊनवर छापा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बनावट सौदर्य प्रसाधनांच्या गोडाऊनवर छापा
बनावट सौदर्य प्रसाधनांच्या गोडाऊनवर छापा

बनावट सौदर्य प्रसाधनांच्या गोडाऊनवर छापा

sakal_logo
By

लोणी काळभोर, ता. २९ : हिंदुस्थान युनीलिव्हर कंपनीच्या नावाने बनावट सौंदर्य प्रसाधने तयार करणाऱ्या सहा जणांकडून पोलिसांनी २८ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई औताडेवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत मंगळवारी (ता. २८) करण्यात आली.

नारायण लालजी मेरा (वय ४५, रा. देवदया नगर सोसियटी), लिनेश हिराचंद गाला (वय ४७, रा. नाहुर व्हिलेज, मुलुंड, मुंबई), प्रवित्र जगबंधु पात्रा (वय ३१, रा. नयखंडी, तहसिल खैरा जिल्हा- बालेश्वर, राज्य ओडीसा), निशिकांत खेत्रमोहन पात्रा (वय २५ रा. नयखंडी, राज्य ओडीसा), मानस बाबुली पात्रा (वय १९, रा. नयखडी, राज्य ओडीसा), गीतम निरंजन मिडघा (वय २९, रा. मधमग्राम, तहसिल मतस्वर, जिल्हा- बडघमवाडी, राज्य पश्चिम बंगाल, सध्या सर्वजण रा. औताडवाडी, ता. हवेली) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी दीपक बाबूलाल पटेल (वय ४३ रा. मालाड, मुंबई) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, औताडेवाडी ग्रामपंचायत हद्दीत गोडाऊनमध्ये काही इसम हे वेगवेगळ्या नामाकित कंपनीचे सौदर्य प्रसाधनाचे नक्कल करून बनावट माल तयार करीत असल्याची माहिती पोलिस हवालदार राजेंद्र दराडे यांना मिळाली होती. त्यानुसार छापा टाकण्यात आला. यावेळी सदर सहा इसम हे गोडाऊन मध्ये मिळून आले. पोलिसांनी गोडाऊन मध्ये तपासणी केली असता पोलिसांना वेगवेगळ्या कंपनीचे सौदर्य प्रसाधने बनविण्यासाठी लागणारे साहित्य मिळून आले. यावेळी पोलिसांनी मेरा याच्याकडे सौदर्य प्रसाधने बाबत विचारपूस केली असता त्याने कोणताही परवाना नसल्याचे सांगितले. तसेच ब्रँडेड कंपनीची हुबेहूब प्रसाधनाची हुबेहूब नक्कल तयार करून बाजारात विक्री करीत असल्याचे सांगितले. त्यानुसार कंपनीतील अधिकाऱ्याशी संपर्क करून माहिती घेतली. त्यानुसार पोलिसांनी स्ट्रिक्स, लॅकमी, लॉरेअल, मॅट्रिक्स, लॅकमी अशा बनावट कंपनीची २८ लाख २६ हजार २१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Lnk22b03367 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..