
यशवंत कारखान्यात तांब्याच्या तारांची चोरी
लोणी काळभोर, ता. २९ : थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्यातून अज्ञात चोरट्यांनी दोन इलेक्ट्रिक मोटारमधील ५० हजार रुपये किमतीच्या तांब्याच्या तारा चोरून नेल्या आहेत. ही घटना रविवारी (ता. २३) पहाटे चार वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली.
याप्रकरणी एजन्सी मॅनेजर दयानंद हनुमंत मोरे (वय ४२, रा. पिंपरी चिंचवड) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दयानंद मोरे यांच्याकडे कारखान्याला सेक्युरिटी पुरविण्याचे कॉन्ट्रॅक्ट आहे. गुरुवारी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सुरक्षा रक्षक रवींद्र किसन काळे याला शुगर हाऊसमध्ये लोखंड तोडण्याचा आवाज आला. त्यानंतर सहकाऱ्यांसमवेत पाहिले असता कंपाउंड तोडल्याचे त्यांच्या लक्षात आले. १०० हॉर्स पॉवरच्या ३ इलेक्ट्रीक मोटारींची तोडफोड करून त्यापैकी २ इलेक्ट्रीक मोटारमधील तांब्याचा वायर व इतर साहित्य चोरीस गेले.
Web Title: Todays Latest District Marathi News Lnk22b03368 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..