कदमवाकवस्ती येथे साडेसहा लाखांची चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कदमवाकवस्ती येथे साडेसहा लाखांची चोरी
कदमवाकवस्ती येथे साडेसहा लाखांची चोरी

कदमवाकवस्ती येथे साडेसहा लाखांची चोरी

sakal_logo
By

लोणी काळभोर, ता. १ : घरी कोणीही नसल्याची संधी साधून चोरट्यांनी रोकड व दागिन्यांसह जवळपास साडेसहा लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील संभाजीनगर परिसरात शुक्रवारी (ता. १) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडली.

याप्रकरणी सुहास सुधाकर बोरकर (वय ४५, रा. श्री कॉम्प्लेक्स सोसायटी, संभाजीनगर, कदमवाकवस्ती, ता. हवेली मूळ रा.बोरकरवस्ती) यांनी लोणी काळभोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुहास बोरकर यांच्या पत्नी नीता या घरी आल्या असता घराचा दरवाजा उघडून घराची पाहणी केली असता बेडरूम मधील कपाटामधील व बेडमधील सामान अस्ताव्यस्त पडल्याचे दिसून आले. बेडमध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने व रोख रक्कम दिसून आली नाही. याची किंमत ६ लाख ६४ हजार ७५० रुपये आहे.

Web Title: Todays Latest District Marathi News Lnk22b03369 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top