सोलापूर-पुणे महामार्गावरील कचऱ्यामुळे दुर्गंधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सोलापूर-पुणे महामार्गावरील कचऱ्यामुळे दुर्गंधी
सोलापूर-पुणे महामार्गावरील कचऱ्यामुळे दुर्गंधी

सोलापूर-पुणे महामार्गावरील कचऱ्यामुळे दुर्गंधी

sakal_logo
By

लोणी काळभोर, ता. १२ : पुणे-सोलापूर महामार्गावरून पुणे महानगरपालिकेच्या ये-जा करणाऱ्या कचरा गाड्यातून पूर्व हवेलीतील लोणी काळभोर, कुंजीरवाडी, उरुळी कांचन येथील रस्त्यावर कचरा सांडला जात आहे. त्यामुळे महामार्गाच्या बाजूला राहत असलेले रहिवाशी, दुकानदारांना व महामार्गावरून जाणाऱ्या नागरिकांना दुर्गंधीचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील कवडीपाठ टोलनाका येथे सोलापूरच्या बाजूकडे जाणाऱ्या एका डंपरमधून भला मोठा कचऱ्याचा ठीग सोलापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर पडला. त्यामुळे कुजलेल्या कचऱ्यामुळे वाहनचालकांना येथून मार्गक्रमण करताना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. या कचऱ्यामध्ये प्लॅस्टिक पिशव्या, शिळे व कुजलेले अन्नपदार्थ, रंगकाम व बांधकामाचे साहित्य आदींचा समावेश आहे.
पुणे महानगरपालिकेचा कचरा पुणे-सोलापूर महामार्गावरून सोलापूरच्या बाजूला घेऊन जाण्यास मनाई असतानाही हा कचरा कोठे घेऊन जातात याबाबत कोणाला ही सांगता येत नाही. तसेच हा कचरा घेऊन जाताना डंपर मधून रस्त्याच्या मधोमध सांडला जात आहे. यापूर्वी पुणे महानगर पालिकेने एका खासगी ठेकेदारावर कारवाई केली होती. तरीही आणखी कचऱ्याच्या डंपरमध्ये वाढ झाली आहे. नेमका हा कचरा जातो कोठे आणि याचे गौडबंगाल काय याचा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

कचरा त्वरित उचलण्याची मागणी
स्थानिक नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पुणे-बाजूकडून सोलापूर बाजूकडे जाणाऱ्या भरधाव डंपरमधून भला मोठा कचरा रस्त्यावर पडला. भरधाव वाहन असल्याने हा कचरा रस्त्यावर पडल्याची माहिती सदर चालकाला नव्हती. त्यामुळे सदर ठिकाणावरून वाहनचालकांना सोलापूरच्या बाजूने जाताना कसरत करीत वाहन चालवावे लागत आहे. कवडीपाट या ठिकाणी जाणाऱ्या पादचाऱ्यांना रस्त्यावरून जाताना नाक मुठीत धरून जावे लागत आहे. त्यामुळे सदरचा कचरा लवकरात उचलावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील टोलनाका परिसरात कचरा पडला असल्याची माहिती मिळाली आहे. त्यानुसार ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना सांगून लवकरात लवकर हा कचरा उचलण्याचे कार्य हाती घेण्यास सांगितले आहे.
- गौरी गायकवाड, सरपंच, कदमवाकवस्ती

02752

Web Title: Todays Latest District Marathi News Lnk22b03376 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..