
लोणी काळभोर पोलिसांकडून दोन सराईत गुन्हेगार तडीपार
लोणी काळभोर, (पुणे) : लोणी काळभोर पोलिच्या हद्दीत दहशत निर्माण करुन लोकांच्या जिवीतास धोका निर्माण करणाऱ्या दोन सराईत गुन्हेगारांना लोणी काळभोर पोलिसांनी दोन वर्षांसाठी पुणे शहर तथा जिल्ह्यातून तडीपार केले आहे.
गणेश शिवाजी चौधरी (वय २४, रा. मराठी शाळेजवळ, वायकर वस्ती, कुंजीरवाडी, ता. हवेली), अजय शाम विश्वकर्मा (वय २० रा. नवीन कॅनॉल रोड, म्हातोबाची आळंदी रोड, कुंजीरवाडी, ता. हवेली) अशी तडीपार करण्यात आलेल्या दोन गुन्हेगारांची नावे आहेत. चौधरी व विश्वकर्मा यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर दुखापत करणे, जखमी करणे, मारहाण, शिवीगाळ, सामाईक इरादा, बेकायदेशीर जमावात सामिल होणे आदी स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.
लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी संबंधीत आरोपींना शहर व जिल्ह्यातुन तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव पोलीस उपआयुक्त नम्रता पाटील यांना पाठविला होता. त्यानुसार नम्रता पाटील यांनी दाखल गुन्ह्यांचा अभिलेख तपासुन महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ प्रमाणे सदर सराइतांना पुणे शहर व पिंपरी चिंचवड आयुक्तालय, पुणे जिल्हयातुन दोन वर्षा करीता तडीपार करण्याचा आदेश पारित केला आहे.
Web Title: Todays Latest District Marathi News Lnk22b03382 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..