पाच वर्षीय मुलीवर तरुणाचा अत्याचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पाच वर्षीय मुलीवर
तरुणाचा अत्याचार
पाच वर्षीय मुलीवर तरुणाचा अत्याचार

पाच वर्षीय मुलीवर तरुणाचा अत्याचार

sakal_logo
By

लोणी काळभोर, ता. १ : लोणी स्टेशन-कदमवाकवस्ती (ता. हवेली) येथील एका तरुणाने नात्यातील पाच वर्षीय मुलीवर मागील वर्षभराच्या काळात अनेक वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला. ऋषीकेश दत्ता गिरी (वय २५, रा. लोणी स्टेशन, कदमवाकवस्ती, ता. हवेली), असे या तरुणाचे नाव आहे.
या प्रकरणी पीडित मुलीच्या आईने लोणी काळभोर पोलिसात तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल होताच गिरी याला अटक केली आहे. पीडित मुलगी लोणी काळभोर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात नातेवाइकांकडे राहते. त्यांची व गिरी याची ओळख आहे. त्यामुळे तो अधूनमधून संबंधितांकडे येजा करत होता. संबंधित कुटुंब दिवसभर कामाला जात असल्याचा गैरफायदा उठवत त्याने मागील वर्षभराच्या काळात मुलीवर अनेक वेळा लैंगिक अत्याचार केले. अत्याचारानंतर तो मुलीला मारहाण करण्याबरोबरच तिच्या आईला जिवे मारण्याची धमकी देत असे. त्यामुळे मुलगी गप्प राहत होती.
दरम्यान, पीडित मुलीची आई सुटीसाठी मुलीला घेऊन तिच्या मूळगावातील घरी गेली. तीन दिवसांपूर्वी आई मुलीला अंघोळ घालत असताना मुलगी विशिष्ट वेळी रडत होती. त्यामुळे आईला मुलीच्या हालचालींबाबत संशय आला. त्यावर आईने मुलीला रडण्याचे कारण विचारले. त्यावर तिने अत्याचाराचा प्रकार पुढे आला. त्यामुळे मुलीच्या आईने थेट लोणी काळभोर पोलिस ठाण्यात जाऊन वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांना माहिती दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करून गिरी याला ताब्यात घेतले. न्यायालयाने त्यास पाच दिवसाची पोलिस कोठडी दिली.

Web Title: Todays Latest District Marathi News Lnk22b03390 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top