रोडरोमिओंना मुलींच्या पालकांकडून चोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रोडरोमिओंना मुलींच्या पालकांकडून चोप
रोडरोमिओंना मुलींच्या पालकांकडून चोप

रोडरोमिओंना मुलींच्या पालकांकडून चोप

sakal_logo
By

लोणी काळभोर, ता. १३ : शाळेतून घरी परतणाऱ्या मुलींची छेड काढणाऱ्या पाच ते सहा रोडरोमिओंना मुलींच्या पालकांनी बुधवारी (ता. १०) चांगलाच धडा शिकवला. त्यांचे लोणी काळभोर, उरुळी कांचन परीसरात कौतुकांचे वातावरण आहे. लोणी काळभोर पोलिसांनीही घडलेल्या घटनेची तात्काळ दखल घेत मुलींची छेड काढणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले.
लोणी काळभोर येथील एका नामांकित कनिष्ठ विद्यालयात थेऊरहुन ये-जा करणाऱ्या सहा मुलींना त्यांच्याच विद्यालयातील तरुन मागिल काही दिवसापासुन त्रास देत होते. मोटारसायकलवरुन पाठलाग करणे, विचीत्र हावभाव करणे, मुली प्रवास करत असलेल्या रिक्षाला मोटारसायकल आडवी मारुन मुलींनी आचकट-विचकट बोलणे हे प्रकार मागिल कांही दिवसापासुन मुली अनुभवत होत्या. सोमवारी (ता. ८) मुली विद्यालयात आल्या असता त्याही दिवसी मुलींना वरील सहा रोडरोमियोच्या त्रासाला सोमोरी जावे लागले होते. त्यापैकी चार मुलींनी रोडरोमिओ करत असलेल्या छेडछाडीची माहिती पालकांना दिली.
दरम्यान, बुधवारी विद्यालयाची वेळ संपल्यावर वरील सहापैकी चार मुली लोणी कॉर्नरवरुन रिक्षातुन थेऊरकडे निघाल्या होत्या. मुली रिक्षात बसताच दोन मोटारसायकलवरुन पाच ते सहा जणांनी मुली बसलेल्या रिक्षाचा पाठलाग सुरु केला. मुली प्रवास करत असलेली रिक्षा थेऊर फाट्याजवळील एस4जी या हॉटेलजळ पोचताच रोडरोमियोंनी दोनपैकी एक मोटारसायकल रिक्षाला आडवी मारुन रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, रिक्षात मुलींच्या बरोबर बसलेल्या मुलींच्या एका पालकाने मोटारसायकलला रिक्षातुनच लाथ मारून मोटार सायकलवरील रोडरोमिसह मोटार सायकलला खाली पाडले.
रिक्षातुन अचानक व अनपेक्षित हल्ला झाल्याने खाली पडलेले दोघेही पळुन जाऊ लागले. त्याचवेळी रिक्षाच्या पाठीमागे असलेल्या मुलींच्या इतर पालकांनी रोडरोमिओंवर हल्ला चढवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे रोडरोमिओ दिसेल त्या दिशेने पळत सुटले. पालकांनी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र रोडरोमिओ हाती लागु शकले नाहीत.

पालकांवर दबाव
याबाबत एका मुलीचे पालक म्हणाले, ‘‘लोणी काळभोर पोलिसांनी आमच्या मुलींना छेडणाऱ्या तीन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेऊन कारवाई केली, ही बाब चांगली आहे. मात्र, काही राजकीय नेते व स्थानिक नागरीक मात्र वरील मुलांबाबत पोलिसांत दिलेली तक्रार मागे घ्यावी, यासाठी आमच्यावर दबाव टाकत आहेत. याबाबत वरीष्ठ अधिऱ्यांनी लक्ष घालुन योग्य ती कारवाई करावी.’’

Web Title: Todays Latest District Marathi News Lnk22b03394 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..