तांबडेमळा आगार उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

तांबडेमळा आगार उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत
तांबडेमळा आगार उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत

तांबडेमळा आगार उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत

sakal_logo
By

मंचर, ता. ३० : तांबडेमळा -मंचर (ता.आंबेगाव) येथे चार वर्षापूर्वी एसटी आगार मंजूर केले. त्यानंतर आगाराचे बांधकामही पूर्ण झाले. पण कोरोनाचे महाभयंकर संकट व एस.टी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे उद्‌घाटन कार्यक्रम लांबणीवर गेला. यामुळे प्रवासीवर्ग एस.टी आगार उद्‌घाटनाच्या प्रतीक्षेत आहे.

आगारात चार सुरक्षा रक्षक व आगर प्रमुख असे एकूण पाचजणच आहेत. आंबेगाव तालुक्यात मंचरच्या दक्षिणेला तीन किलोमीटर अंतरावर तांबडेमळा ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात एसटी आगारासाठी जागा उपलब्ध करून देण्याचे काम राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले. येथे आगार प्रमुख म्हणून बालाजी सूर्यवंशी यांची नियुक्ती केली आहे. पण येथे एस.टी गाड्या, अन्य कर्मचारी नसल्याने व आगार कार्यान्वित न झाल्याने प्रवाशांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
सध्या आंबेगाव तालुक्यासाठी नारायणगाव आगाराद्वारे चार एस.टी गाड्याद्वारे २८ मार्गावर व राजगुरुनगर आगाराद्वारे चार एस.टी गाड्याद्वारे ३८ मार्गावर फेऱ्या पूर्ण केल्या जातात. याव्यतिरिक्त शिवाजीनगर व शिरूर आगाराच्याही एस.टी गाड्यांद्वारे भीमाशंकर मंचर भागातील मार्गावर एस.टी गाड्यांची सोय केली आहे.

यात्रा, लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. त्यामुळे प्रवाशांची वर्दळ वाढली आहे. तांबडेमळा एस.टी आगाराचे कामकाज त्वरित सुरू करावे, अशी मागणी आदर्शगाव गावडेवाडीच्या सरपंच स्वरूपा ऋषिकेश गावडे व तांबडेमळा ग्रामपंचायतीचे सरपंच माऊली भोर यांनी केली आहे.

आंबेगाव तालुक्यात मंचर बस स्थानकातून नारायणगाव, राजगुरुनगर, शिवाजीनगर आगारामार्फत एकूण १३० एस.टी गाड्यांच्या फेऱ्याद्वारे प्रवासी वाहतूक केली जाते. त्यामध्ये मुंबई-२१, नाशिक-२०, पुणे-२८, भीमाशंकर-१२ मार्गांचा समावेश आहे. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता गृह व सर्व पंखे सुरू आहेत. विविध पासचीही सुविधा आहे, अशी माहिती मंचर बसस्थानकाचे वाहतूक नियंत्रक सलील मोहम्मद सय्यद यांनी दिली.


तांबडेमळा- मंचर (ता.आंबेगाव) आगारात डिझेल पंपाचे काम अपूर्ण आहे. अन्य सर्व सुविधा उपलब्ध आहेत. पंपाचे काम पूर्ण झाल्यानंतर तसेच एस.टी गाड्या, कर्मचारी उपलब्ध झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतर आगाराचे कामकाज सुरू करणे शक्य होईल.
- बालाजी सूर्यवंशी, आगार प्रमुख तांबडेमळा- मंचर (ता.आंबेगाव)
05434

Web Title: Todays Latest District Marathi News Mac22b03207 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top