
अनुसया महिला पतसंस्थेच्या अध्यक्षपदी किरण दिलीप वळसे पाटील बिनविरोध
मंचर, ता.२८ : येथील अनुसया महिला नागरी पतसंस्था पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणूक बिनविरोध झाली. अध्यक्षपदी किरण दिलीप वळसे पाटील, व उपाध्यक्षपदी वैशाली सदाशिव बेंडे यांची बिनविरोध फेरनिवड झाली.
मंचर (ता. आंबेगाव) येथे निवडणूक प्रकिया निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा जरे यांच्या उपस्थित पार पडली. नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व संचालक यांचा सत्कार शरद बँकेच्या संचालिका सुषमा शिंदे, सुनीता पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पतसंस्थेच्या सचिव गायत्री वाळेकर व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी एस. एस चौधरी उपस्थितीत होते.
बिनविरोध निवड झालेल्या संचालकांची नावे : ज्योती शेंडे, उज्वला गावडे, इंदूबाई लोहकरे, सरस्वती शिंदे, सीताबाई चासकर, पुष्पलता वळसे, जयश्री रोकडे, ज्योती घोडेकर, आशा बोंडवे.
अनुसया महिला नागरी सहकारी पतसंस्थेचे मार्गदर्शक गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आहेत. पतसंस्थेला सतत ''अ'' ऑडिट वर्ग आहे. ठेवी सात कोटी ५० लाख रुपये असून कर्जवाटप पाच कोटी ५० लाख रुपये व खेळते भाग भांडवल नऊ कोटी ७० लाख रुपये आहे.
- किरण दिलीप वळसे पाटील, अध्यक्ष अनुसया महिला नागरी सहकारी पतसंस्था, मंचर.
05443
Web Title: Todays Latest District Marathi News Mac22b03211 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..