
शेतीमालास हमी भाव द्या : बांगर शेतीमालाला हमी भाव द्या : बांगर
मंचर, ता. ३० : ''''महाराष्ट्र दिनानिमित्त एक मे रोजी ग्रामसभेला हजर राहून महावितरण कंपनीने कृषी पंपाना दिवसा दहा तास वीजपुरवठा करावा, शेतीमालाला किमान हमीभाव द्यावा, असे दोन ठराव मंजूर करून swabhimani2019@gmail.com या मेल आयडीवर पाठवून द्यावेत,'''' असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंबेगाव तालुक्याचे अध्यक्ष प्रभाकर बांगर यांनी केले आहे.
यावेळी बांगल म्हणाले, की शेतकरी वर्ग वगळता समाजातील इतर सर्व घटकांना २४ तास वीजपुरवठा केला जातो. याउलट शेतकऱ्यांना शेतीसाठी केवळ आठ तास वीजपुरवठा केला जातो. तोही बहुतांश कालावधीत रात्रीच्या वेळी केला जातो. शेतकऱ्यांवर होत असलेला अन्याय मूलभूत अधिकारावर गदा आणण्याचा प्रकार आहे. सध्या दिवसा आठ ते दहा तास काम करून पुन्हा रात्रीचे वेळी शेतात कष्ट करणे शक्य नाही. रात्रीच्या वेळी जंगली प्राणी, साप, हिंस्त्र श्वापदे अन्नाच्या शोधासाठी बाहेर पडतात. त्यामुळे प्राण्यांच्या हल्ल्यात आत्तापर्यंत हजारो शेतकऱ्यांचा नाहक बळी गेलेला आहे. शेतमालास कायद्याने मंजूर हमीभावापेक्षा कमी किमतीमध्ये कोणालाही शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी करता येणार नाही, अशा आशयाचा कायदा केंद्रशासनाने मंजूर करुन लागू करावा. हे दोन ठराव मंजूर होण्यासाठी ग्रामसभेत शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा. अधिक माहितीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना, मध्यवर्ती कार्यालय, जयसिंगपूर (ता. शिरोळ जि. कोल्हापूर) दूरध्वनी क्रमांक 02322- 225027 येथे संपर्क करावा.”
Web Title: Todays Latest District Marathi News Mac22b03217 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..