
सभामंडपाच्या हिशोबावरून गावडेवाडीत तलवारीने वार
मंचर, ता. ४ : आदर्शगाव गावडेवाडी (ता. आंबेगाव) येथे रानू गावडे मळावस्तीत ‘‘श्रीराम मंदिर सभामंडपाच्या कामाचा हिशोब दिला नाही. या पैशाचा वापर कार्यकर्त्यांनी चित्रपट पाहण्यासाठी केला,’’ असा आरोप करून व राग मनात धरून अक्षय जयसिंग गावडे (रा. गावडेवाडी) याने नीलेश एकनाथ गावडे (वय ३७, रा. गावडेवाडी) यांच्यावर तलवारीने वार केल्याची घटना नुकतीच घडली. या बाबत मंचर पोलिस ठाण्यात अक्षय गावडे विरुद्ध गुन्हा दाखल झाल्याची माहिती पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांनी दिली.
नीलेश गावडे कालव्याजवळून जात असताना श्रीराम मंदिर सभामंडपाच्या कामाच्या हिशोबावरून अक्षय भांडण करू लागला. त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. त्याने तलवार मारल्यानंतर नीलेश यांनी लगेचच तलवार पकडली. नीलेश यांच्या हाताला, तोंडाला व कानाला दुखापत झाली. या अवस्थेतही नीलेश यांनी तलवार पायाखाली दाबून धरली. त्यावेळी संतोष निवृत्ती गावडे मदतीसाठी आले. त्यांनी नीलेश यांची सुटका केली. त्यावेळी अक्षय गावडे म्हणाला ‘‘तुम्ही कोणालाही बोलवा. मी घाबरत नाही. तुझा खून पाडल्याशिवाय राहणार नाही,’’ अशी धमकी देऊन अक्षय निघून गेला, असे नीलेश गावडे यांनी पोलिसांकडे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी पोलिस हवालदार गणेश डावखर पुढील तपास करीत आहेत.
Web Title: Todays Latest District Marathi News Mac22b03233 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..