
गावडेवाडीला ‘दत्तगुरू’च्या अध्यक्षपदी पिंपळे
मंचर, ता. ३ : गावडेवाडी (ता. आंबेगाव) येथील श्री दत्तगुरू शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेच्या अध्यक्षपदी संजय पिंपळे व उपाध्यक्षपदी सुनील गावडे यांची बिनविरोध निवड झाली. २०१९ ते २०२४ या कालावधीसाठी असलेल्या कार्यकारिणीची पद फेररचना करण्याचा ठराव संमत झाल्याने ही फेररचना करण्यात आली. या वेळी भीमाशंकर कारखान्याचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गावडे, तंटामुक्त ग्राम समितीचे अध्यक्ष देवराम गावडे यांच्या हस्ते पिंपळे व गावडे यांच्यासह नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
निवड झालेल्या अन्य पदाधिकाऱ्यांची नावे
कार्याध्यक्ष - अनिल गावडे, खजिनदार- नवनाथ गावडे, सहसचिव - लक्ष्मण पिंपळे, लता शिंदे.
या वेळी पिंपळे म्हणाले, ‘‘गावकऱ्यांच्या एकजुटीमुळे श्री दत्तगुरू शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेचे कामकाज समाजाभिमुख आहे. संस्थेच्या हिरकणी विद्यालयातून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी प्रशासनात व विविध कंपन्यांमध्ये उच्चपदस्थ अधिकारी आहेत. मुख्याध्यापक विनोद बोंबले यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिक्षक विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी घेत असलेली मेहनत कौतुकास्पद आहे.’’
Web Title: Todays Latest District Marathi News Mac22b03234 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..