आढळराव लोकसभेत दिसतील | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आढळराव लोकसभेत दिसतील
आढळराव लोकसभेत दिसतील

आढळराव लोकसभेत दिसतील

sakal_logo
By

मंचर, ता. ६ : ‘‘शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केलेली कामे जनतेने जवळून पहिली आहेत. त्यांच्यामागे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेना खंबीरपणे उभी आहे. कोणी काही म्हणत असले, तरी आढळराव पाटील हे संसदेत दिसतील,’’ असा विश्वास शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी व्यक्त केला.
लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथे शुक्रवारी (ता. ६) संध्याकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत राऊत बोलत होते. यावेळी आढळराव पाटील, शिवसेनेचे संपर्कप्रमुख सचिन आहेर, माजी आमदार शरद सोनवणे, जिल्हाप्रमुख माउली कटके, उद्योजक लक्ष्मण काचोळे, बाळासाहेब सावंत पाटील आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्थानिक स्वराज्य संस्था महाविकास आघाडी एकत्र लढविणार आहे, असे वक्तव्य केल्याचे पत्रकारांनी निदर्शनास आणून दिल्यानंतर राऊत म्हणाले, ‘‘ते महाविकास आघाडीचे मोठे नेते आहेत. त्यांची भूमिका योग्य आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांप्रमाणेच राष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकाही एकत्रितपणे लढण्यासंदर्भात महाविकास आघाडीमध्ये एकमत आहे. देशात हा प्रयोग यशस्वी करून दाखवू.’’

‘एकत्रित बसून मार्ग काढणार’
लोकसभेला आघाडी झाल्यानंतर आढळराव पाटील यांचे भवितव्य काय? या प्रश्नाला उत्तर देताना राऊत म्हणाले, ‘‘शिरूर लोकसभा मतदारसंघात एकत्रित बसून चर्चा करून योग्य मार्ग काढला जाईल. दोन-तीन पक्षाचे सरकार असले की कार्यकर्त्यांमध्ये कुरबुरी सुरूच असतात. पण, या संदर्भातही सचिन आहेर हे पुढाकार घेऊन शिवसेना कार्यकर्त्यांना न्याय देण्याची भूमिका घेत आहेत. पक्ष संघटना वाढीसाठी आम्ही सर्वजण आढळराव पाटील यांच्याबरोबर आहोत.’’

Web Title: Todays Latest District Marathi News Mac22b03246 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top