शिरूरच्या खासदारांना शोधावं लागतं : राऊत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिरूरच्या खासदारांना
शोधावं लागतं : राऊत
शिरूरच्या खासदारांना शोधावं लागतं : राऊत

शिरूरच्या खासदारांना शोधावं लागतं : राऊत

sakal_logo
By

मंचर, ता. ७ : ‘‘शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे उपनेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे जनतेसाठी २४ तास उपलब्ध होते. आताच्या विद्यमान खासदारांना शोधावं लागतं, हे आता जनतेच्याही लक्षात आले आहे,’’ अशी टीका शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचे नाव न घेता केली.
लांडेवाडी (ता. आंबेगाव) येथे झालेल्या शिवसेना कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राऊत बोलत होते. यावेळी आढळराव पाटील, शिवसेनेचे संपर्कप्रमुख सचिन अहिर, जिल्हाप्रमुख व माजी आमदार शरद सोनवणे, उपजिल्हा प्रमुख सुनील बाणखेले, उद्योजक लक्ष्मणराव काचोळे, भैरवनाथ पतसंस्थेचे उपाध्यक्ष सागर काजळे, देविदास राजगुरू, सुरेश घुले, अशोक बाजारे, राम तोडकर, संतोष डोके, रवींद्र वळसे-पाटील आदी उपस्थित होते.
राऊत म्हणाले, ‘‘तुम्ही उमेद हरवून बसला, तर शत्रूला बरं वाटतं. आज लोकसभा व विधानसभा आपल्याकडे नाही, पण भविष्यात नसतील, असं नाही. राजकारण खूप चंचल असते. पण, मतदार हे त्याहूनही चंचल असतात. आढळराव पाटील यांच्या पराभवाबाबत लोक हळहळ व्यक्त करतात. कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी काम करावे.’’

Web Title: Todays Latest District Marathi News Mac22b03251 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top