हिंदू-मुस्लिम धर्मगुरूंची गळाभेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिंदू-मुस्लिम धर्मगुरूंची गळाभेट
हिंदू-मुस्लिम धर्मगुरूंची गळाभेट

हिंदू-मुस्लिम धर्मगुरूंची गळाभेट

sakal_logo
By

मंचर, ता. ९ : मंचर पोलिस ठाण्याच्या आवारात रविवारी (ता. ८) संध्याकाळी ईद-ए-मिलननिमित्त झालेल्या कार्यक्रमात हिंदू व मुस्लीम समाजाच्या धर्मगुरूंनी गळाभेट घेऊन एकमेकांना गुलाबाची फुले देवून ‘हम सब एक है’ असा जयघोष केला. राष्ट्रीय एकात्मता संदेशाचे स्वागत उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून केले.
खेड विभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन पाटील, सचिन महाराज बेंडे, मौलाना वसीर जैद, मौलाना मुफ्ती फरीद, मुस्लीम समाजाचे नेते राजू इनामदार, कॉंग्रेसचे नेते अल्लू इनामदार, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते बाळासाहेब बाणखेले, शिवसेनेचे ज्येष्ठनेते अविनाश रहाणे, लाला बँकेचे अध्यक्ष युवराज बाणखेले, शरद बँकेचे संचालक अजय घुले, दत्ता थोरात, भाजपचे तालुका अध्यक्ष ताराचंद कराळे, जे. के. थोरात, प्रवीण मोरडे, सुहास बाणखेले, संतोष बाणखेले, अरुण लोंढे यांच्यासह मुस्लीम समाजाचे धर्मगुरू उपस्थित होते.
सचिन महाराज बेंडे, मौलाना वसीर जैद यांनी शांतता व सुव्यवस्था राखून प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन केले. भाजप किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष संजय थोरात, ॲड. संध्या बाणखेले, कामगार नेते ॲड. बाळासाहेब बाणखेले, वसंतराव बाणखेले, डी. के. वळसे पाटील यांची मनोगते झाली.
पोलिस उपनिरीक्षक रूपाली पवार यांनी प्रास्ताविक व सहाय्यक पोलिस निरीक्षक किरण भालेकर यांनी सूत्रसंचालन केले. पोलिस निरीक्षक सतीश होडगर यांनी आभार मानले.

“मंचर शहरातील हिंदू व मुस्लीम समाजाचे ऐक्य व परंपरेचे पालन तरुण पिढीकडून केले जात आहे. ही अभिमानाची बाब आहे. गणेश विसर्जन मिरवणुकीत मुस्लीम समाजाकडून गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांचा सन्मान व ईद-ए-मिलनप्रसंगी हिंदू बांधवांकडून मुस्लीम बांधवांचा सन्मान हा आदर्श सर्वांनाच प्रेरणा व प्रोत्साहन देणारा आहे.”
सुदर्शन पाटील, उपविभागीय पोलिस अधिकारी, खेड विभाग

Web Title: Todays Latest District Marathi News Mac22b03256 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top