कारेगाव येथे खिशेकासून अटक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कारेगाव येथे खिशेकासून अटक
कारेगाव येथे खिशेकासून अटक

कारेगाव येथे खिशेकासून अटक

sakal_logo
By

मंचर, ता.१२ : कारेगाव (ता.आंबेगाव) येथील बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी आलेले तुकाराम जयराम कराळे (वय ६० रा.कारेगाव) यांच्या खिशातील तीस हजार रुपये चोरल्याप्रकरणी किसन अण्णा गायकवाड वय ५० रा.देहूफाटा झोपडपट्टी ता.हवेली) याला रंगेहात पकडण्यात आले. यामुळे मंचर पोलिसांनी आरोपीस अटक केली आहे.
तुकाराम कराळे कारेगाव येथे बैलगाडा शर्यती पाहण्यासाठी घाटात आले होते. त्यांच्या खिशात विविध कार्यकारी सोसायटी कारेगाव येथे भरण्यासाठी ठेवलेली तीस हजार रुपये रक्कम होती. ती रक्कम किसन गायकवाड हा चोरत असताना त्याला पकडले. याबाबतची फिर्याद कराळे यांनी मंचर पोलिस ठाण्यात दिली होती.

Web Title: Todays Latest District Marathi News Mac22b03263 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top