गावडेवाडीत शिबिरात ८० रुग्णांची नेत्र तपासणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

गावडेवाडीत शिबिरात ८० रुग्णांची नेत्र तपासणी
गावडेवाडीत शिबिरात ८० रुग्णांची नेत्र तपासणी

गावडेवाडीत शिबिरात ८० रुग्णांची नेत्र तपासणी

sakal_logo
By

मंचर, ता. १४ : आदर्शगाव गावडेवाडी (ता. आंबेगाव) येथे अटल बिहारी वाजपेयी विचार मंच व मनोहर डोळे मेडिकल फाउंडेशन यांच्यावतीने मोफत नेत्र तपासणी शिबिरात ८० रुग्णांची तपासणी करण्यात आली. शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. यावेळी भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर गावडे, सरपंच स्वरूपा गावडे, माजी सरपंच संतोष गावडे, विजय गावडे, ऋषिकेश गावडे, संतोष हिंगे, मेघश्याम भोर, गणेश बाणखेले, युनूस इनामदार उपस्थित होते. याप्रसंगी आंबेगाव तालुक्यात भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष डॉ. ताराचंद कराळे व अटल संस्थेचे संस्थापक संदीप बाणखेले यांच्या नेतृत्वाखाली आंबेगाव तालुका मोतीबिंदू मुक्त करण्याचा संकल्प केला. असे आरोग्यदूत सुशांत थोरात यांनी सांगितले. श्यामकांत शिंदे यांनी प्रास्ताविक व एकनाथ गावडे यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest District Marathi News Mac22b03269 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top