
‘उच्च शिक्षित प्राथमिक शिक्षकांना पदोन्नती द्यावी’
मंचर, ता. २९ ः राज्यात प्राथमिक शिक्षण क्षेत्रामध्ये बी. एड, एम. एड नेट- सेट पीएचडी असे उच्च शिक्षण घेतलेले अनेक शिक्षक आहेत. संबंधित शिक्षकांना शिक्षण क्षेत्रामध्ये पदोन्नती देण्यासंदर्भात विचार केला जावा. त्यासाठी शिक्षण क्षेत्रामध्ये नवीन येणाऱ्या शैक्षणिक धोरणाच्या तत्त्वांमध्ये सेवेमध्ये कार्यरत असणाऱ्या उच्चशिक्षित शिक्षकांना वरिष्ठ पदावर कार्य करण्याच्या संधी मिळाव्यात, अशी मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक कृती समितीचे अध्यक्ष राजू जाधव यांनी केली.
पुण्यात राज्य प्राथमिक शिक्षण संचालक दिनकर टेमकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत जाधव बोलत होते. यावेळी राज्यातील विविध प्राथमिक शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जाधव म्हणाले, ‘‘शैक्षणिक धोरणाच्या तत्त्वानुसार सेवेमध्ये कार्यरत असणाऱ्या उच्च शिक्षण सेवकांना वरिष्ठ पदावर कार्य करण्यास संधी दिल्या जाव्यात. त्यानुसार इतर विभागामध्ये ज्याप्रमाणे सेवेत कार्यरत असणाऱ्यांना विविध प्रकारच्या बाजूनी संधी उपलब्ध आहेत. तशा संधी प्राथमिक शिक्षकांना विहित मुदतीत उपलब्ध करून द्याव्यात. त्यांच्या अनुभवाचा शिक्षण क्षेत्राला फायदा होऊ शकेल. 2014 सेवाशर्ती अधिनियमात दुरुस्ती करून केंद्रप्रमुख, विस्तार अधिकारी या पदावर सरळ सेवेने प्रविष्ट होण्यासाठी वयाची अट रद्द करून शंभर टक्के प्राथमिक शिक्षिकांमधूनच ही पदे भरली जावीत. या मागणीचा पाठपुरावा संघटना करेल.’’
या प्रसंगी राज्यकृती समितीचे सरचिटणीस प्रदीप शिंदे, सातारा जिल्हाध्यक्ष शिवाजी माने, कार्यालयीन चिटणीस देवप्रसाद तावरे यांच्यासह प्रमुख संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
Web Title: Todays Latest District Marathi News Mac22b03309 Txt Pd Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..