शिरूर मतदार संघासाठी तीन कोटींचा निधी मंजूर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिरूर मतदार संघासाठी 
तीन कोटींचा निधी मंजूर
शिरूर मतदार संघासाठी तीन कोटींचा निधी मंजूर

शिरूर मतदार संघासाठी तीन कोटींचा निधी मंजूर

sakal_logo
By

मंचर, ता. ९ : शिरूर लोकसभा मतदार संघातील स्थापन झालेल्या मंचर नगरपंचायतीसह आळंदी, चाकण, राजगुरुनगर, जुन्नर व शिरूर नगरपरिषदेतील विविध विकास कामांसाठी तीन कोटी रुपयांचा निधी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मंजूर झाला आहे, अशी माहिती माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी दिली.
मंजूर निधी पुढीलप्रमाणे : मंचर येथे भाजीपाला बाजार तळाजवळ उद्यानाची निर्मिती (एक कोटी रुपये), आळंदी-नगरपरिषद शाळा क्र.४ येथे उद्यान विकसित करणे- ६० लाख रुपये, चाकण-नगरपरिषद हद्दीतील चक्रेश्वर मंदिर स्मशानभूमीलगत संरक्षक भिंत बांधकाम व सौर ऊर्जा युनिट उभारणे- ३५ लाख रुपये, राजगुरुनगर-स्मशानभूमी परिसर सुधारणा करणे- ३० लाख रुपये, जुन्नर-खालचा माळीवाडा ते उत्तरेश्वर मंदिरापर्यंत रस्ता डांबरीकरण करणे- २५ लाख रुपये व शिरूर नगर परिषदेसाठी विद्युत विभाग व अन्य आनुषंगिक कामांसाठी हायड्रोलिक शिडी असणारे बहुपयोगी वाहन उपलब्ध करणे- २५ लाख रुपये.

Web Title: Todays Latest District Marathi News Mac22b03351 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top