मंचर येथील कारवाईत पाच लाखांचा गुटखा जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मंचर येथील कारवाईत
पाच लाखांचा गुटखा जप्त
मंचर येथील कारवाईत पाच लाखांचा गुटखा जप्त

मंचर येथील कारवाईत पाच लाखांचा गुटखा जप्त

sakal_logo
By

मंचर, ता. १८ : मंचर (ता. आंबेगाव) येथील बसस्थानकासमोर पाच लाख २७ हजार ९२० रुपये किमतीचा गुटखा व सोळा लाख रुपये किमतीचा टेम्पो, असा एकूण २१ लाख २७ हजार ९२० रुपयाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.
याप्रकरणी टेम्पो मालक सागर काळूराम पडवळ (वय २९, रा. भोरदरा-आंबेठाण, ता. खेड) याच्या विरोधात मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मंचर एसटी बसस्थानकासमोर टेम्पोमधून (क्र. एमएच १४ जेएल ५६०६) अवैधरीत्या गुटखा वाहतूक होणार असल्याची गुप्त बातमी पोलिसांना मिळाली. पोलिस निरीक्षक सतीश होडगर, पोलिस जवान एम. बी. लोखंडे, पोलिस जवान जी. डी. येळवंडे यांनी टेम्पो थांबविला. मात्र, चालक पळून गेला. पोलिसांना गाडीत असलेल्या खाकी बॉक्समध्ये व पांढरे रंगाचे गोणपाटांच्या पिशव्यामध्ये गुटखा पानमसाला व सेंटेड तंबाखू मिळाली. पडवळ याच्या सांगण्यावरून टेम्पो चालक अवैधरीत्या गुटख्याची वाहतूक करत होता. परंतु, पळून गेलेल्या टेम्पो चालकाची अद्याप माहिती मिळाली नाही. याबाबत मंचर पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार सोमनाथ गवारी यांनी फिर्याद दाखल केली आहे.
या कारवाईत सहायक पोलिस निरीक्षक बालाजी कांबळे, किरण भालेकर, पोलिस उपनिरीक्षक सोमशेखर शेटे, पोलिस नाईक नीलेश खैरे, सोमनाथ वाफगावकर, मंगेश लोखंडे, राजेंद्र हिले, योगेश रोडे, संपत कारभळ, चालक शरद कुलवडे यांनी सहभाग घेतला.

Web Title: Todays Latest District Marathi News Mac22b03386 Txt Pd Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top